🌹🌹चला कोकणात 🌹🌹

निसर्गसुंदर कोकण नेमके कसे आहे ? अशी विचारणा मध्यप्रदेशात राहणाऱ्या एका मित्राने एकदा मला केली होती. कोकणातील सुंदरतेचे वर्णन त्याला ऐकवले. तो कोकणात यायला निघाला. ‘ आमचे कोकण दोन दिवसांत पाहून होणार नाही, त्यासाठी निवांत वेळ काढून कोकणांत यावे लागते’, अशी स्पष्ट कल्पना त्याला मी दिली. ‘कोकणात मी येणारच’ असे त्याने पक्के ठरवले. प्रारंभी सिंधूदुर्ग जिल्ह्यातील काही महत्वाची ठिकाणे दाखविण्याचे नियोजन करून मी या मित्राला कोकणात यायचे निमंत्रण दिले. दोघेही भटक-भ्रमंती करणारे असल्यामुळे कोणतेही खासगी वाहन न घेता सार्वजनिक वाहनांची मदत घेत चालत-फिरत मनसोक्त भटकण्याचा आम्ही आनंद लुटला. हा आनंद तुम्हीही घ्यावा म्हणुन दोन छोट्या कोकण सफरींचा वृत्तांत येथे देत आहे……….. 🌹लपलेले सौंदर्य : निवती🌹 ...