Saturday, 1 August 2020

💐मन भावन गीत💐

💐मन भावन गीत💐

               या महिन्याचे विशेष म्हणजे आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन, मात्र या वर्षी महामारीच्या विळख्यात सापडलेला आपला देश अजूनही अस्वास्थ्य  अवस्थेत आहे. आणि म्हणून नेहेमीच्या जल्लोषात हा स्वातंत्र्य दिन  साजरा करणे शक्य नाही, याची खंत मनी आहे.

                   म्हणून, मी या स्वातंत्र्य दिनी आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजास  मानवंदना देताना, कविवर्य  . दि. माडगूळकर यांनी रचलेले एक  राष्ट्रगौरव गीत येथे सादर करीत आहे……………



💐जयगीत जागृतीचे……

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे || धृ. ||

 

कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघुत्तमाची ; रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे ; आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||||

 

येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने ; पार्थास बोध केला, येथेच माधवाने

हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे ; आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||||

 

येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा ; येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा

हे क्षेत्र पुण्यदायी भगवान तथागताचे ; आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||||

 

हे राष्ट्र विक्रमांचे, हे राष्ट्र शांततेचे ; सत्यार्थ झुंज द्यावी, या जागत्या प्रथेचे

येथे शिव-प्रतापी, नरसिंह योग्यतेचे ; आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||||

 

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे, जन शासनातळीचा पायाच सत्य आहे

येथे सदा निनादो, जयगीत जागृतीचे ; आचंद्रसूर्य नांदो  स्वातंत्र्य भारताचे ||||

 

                                         ____________