Friday, 2 July 2021

💐💐वाचन छंद💐💐

  मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मुक्तपणे सफर करताना, जुन्या नव्या गाजलेल्या स्टार अभिनेते अभिनेत्रींना परिचित असणारे, तसेच  सिने क्षेत्रातील घडामोडींवर चौफेर लेखन करणारे प्रसिद्ध सिनेपत्रकार म्हणजे स्वर्गीय इसाक मुजावर. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या रसरंगया सिने साप्ताहिकाचे  ते संपादक होते. जवळपास पन्नास पुस्तके या लेखकानी लिहिली आहेत.  

              रफीनामा हे त्यांचे मराठी पुस्तक एकदा  माझ्या वाचनात आले. गोड गळ्याचे पार्श्वगायक महंमद रफी यांच्या गायन कारकिर्दीचा पूर्ण आलेख इसाक  मुजावर यांनी त्यांच्या रफीनामा मध्ये लिहिलाय.

              ३१ जुलै हा स्वर्गीय महंमद रफी यांचा स्मृतिदिन, त्यांना आदरांजली वाहून मी या पुस्तकाचा मला झालेला परिचय इथे कथन करीत आहे…….....

💐रफीनामा💐              

               रफीनामाया पूस्तकात महंमद रफी यांची जीवन कहाणीच नव्हे, तर त्यांच्या गाण्यांचा  प्रारंभीपासूनचा इतिहास लेखकाने मेहेनत घेऊन संकलित केलेला आहे.

                   खूप जुनी गाणी, त्यांच्या जन्मकथा, निर्माते, संगीतकार, गायक-गायिका, तसेच अशोककुमार, शम्मी कपूर, राज कपूर, असे कितीतरी दिगग्ज अभिनेते या पुस्तकात आपल्या समोर येतात.

                   गान कोकिळा लता मंगेशकर, शमशाद बेगम, सुमन कल्याणपुरकर, मुकेश, सैगल, मन्ना डे, किशोर कुमार, आशा भोसले, सुधा मल्होत्रा, अशा  दिग्गज गायकांसमवेत महंमद रफीनी हजारो गीतं गायली आहेत, याची माहिती या पुस्तकात आपल्याला ज्ञात होते.

                   या शिवाय, अमिताभ बच्चन, महमूद, जॉनी वॉकर, या प्रसिद्द कलावंतांना बरोबर घेऊन रफीनी गायलेली गाणी देखील वाचकाला आगळी माहिती देतात.

                   संगीतकार सी. रामचंद्र यांचे आवडते गीत-‘ सुहानी रात ढल चुकी, ना जाने कब आवोगे….-‘दुलारी सुरेशच्या या नटाने म्हटलेले गाणे  ऐकल्यावर त्यांना शांत झोप लागायची !  ते सांगत, ‘त्यांच्याच संगीताचे अलबेलातले धीरे से आजारे अखियन मे ….’    कुंदनलाल सैगलचे सोजा राजकुमारी…..’हे पण प्रसिद्ध गीत. (संगीत त्यांचे नव्हते)-चित्रपट होता प्रेसिडेंट’, पण याही पेक्षा सुहानी रात…….’सी.रामचंद्रना अधिक आवडायचे.

                    बैजू बावरा  ची विशेष आठवण संगीतकार नौशादनी सांगितलेली आहे—‘ मन तडपत हरिदर्शन को आज……..हे रफीने गायलेले गीत होते. त्याचे गीतकार होते शकील बदायुनी. या गीताचे गायक,गीतकार अन संगीतकार तिघेही मुस्लिम धर्मीय. पण,  एकदा नौशाद अमेरिकेत गेले असताना तेथे बनारसच्या एका संगीतप्रेमी चाहत्याने त्यांना माहिती दिली की, तो चाहता बनारसला असताना मंदिरासमोरच्या घरात राहायचा. सकाळी उठायचा, तेव्हा घरासमोरील मंदिरात ज्या ध्वनिमुद्रिका लागायच्या, त्यातली एक ही मन तडपत

….’ होती. ती तो रोज ऐकायचा. ते गाणं त्याला खूप आवडायचे. हे गीत त्याचे भक्तिभाव जागवायचे.

                 नंतर त्याला या गीताविषयी अधिक माहिती मिळाली. पण त्याचा भक्तिभाव नाही कमी झाला.

                 अमेरिकेत नौशादजींशी त्या गान रसिकाची भेट झाल्यावर त्याने ही हकीकत नौशादना स्वतः ऐकवली, ती त्यांनी लेखकास सांगितली.

                  हातीमताई(१९५६) या चित्रपटाचा नायक होता जयराज. तो मूळचा हैदराबादचा. चित्रपट तेथे प्रसिद्द झाल्यावर  हैदराबादच्या निझामास कळले. त्याच्यासाठी खास शो पॅलेसमध्ये आयोजित केला गेला. निझाम त्याच्या जनानखान्यासह चित्रपट पाहायला बसला. त्यात संगीतकार एन. एस. त्रिपाठींचे रफीने गायलेले जयराजवर चित्रित केलेले परवर दिगार आलम, तेराही है सहारा, तेरे सीवा जहाँमे कोई नही हमारा……..’ हे  गाणं ऐकून निझाम भारावून गेला. ते गाणं  तो परत परत ऐकू लागला…….!

                   राजेंद्रकुमार आणि सुनिल दत्त हे पाकिस्तानातून भारतात आलेल्या मूळ निर्वासित कुटुंबातील होते, तर दिलीपकुमार पुण्यातील मिलिटरी कॅन्टीनची नोकरी सुटल्यावर मुंबईत आला होता.

                   बैजू बावरा (१९५२) चे निर्माता दिग्दर्शक विजय भट्ट यांना नायक दिलीपकुमार हवा होता. त्यालाही यात भूमिका हवी होती. मात्र  बैजूची गौरी म्हणून भूमिका करणारी मीना कुमारी त्याला नको होती, कारण ती त्याकाळी एवढी प्रसिद्ध नव्हती ! त्यामुळे दिलीपकुमारने नर्गिसला चित्रपटात घेण्याचा आग्रह धरला. पण विजय भट्ट तयार झाले नाहीत. त्यांनी शेवटी भारतभूषणला घेतले आणि बैजू बावरापूर्ण केला.

                   याच दिलीपकुमारचा पहिला चित्रपट होता ज्वारभाटा(१९४४), तर रहेमानचा हम एक है(१९४६).

                   १९५८ च्या चंद्रगुप्तमध्ये रफी लताने गायलेले भारत भूषणच्या तोंडी असणारे, ‘ चाहे पास हो, चाहे दूर हो,  मेरे सपनोकी तुम तकदीर हो…….. ‘, हे गीत  भारतभूषण निरुपा रॉय बरोबर गायला. या गीतास संगीत दिले होते  कल्याणजी विरजी शाह यांनी.

                    नायक खलनायकाची भूमिका करणाऱ्या अजितचे खरे नाव हमीद. त्याचा प्रथम चित्रपट , ‘ शाह मिसर’(१९४६). १९४९ च्या जीवनसाथीपासून तो अजित झाला ! त्याच्या तोंडी रफीने गायलेले प्रसिद्द गीत होते-‘ आजा के इंतजार मे , जाने को है बहार भी, तेरे बगैर जिंदगी दर्द बनके………’ सहगायिका होती लता मंगेशकर. चित्रपट होता मेहेंदी’(१९५८). रवीचे संगीत होते. याच चित्रपटाची कथा उमराव जान(१९८१) मध्ये नंतर आली.

                   व्ही. शांतारामच्या पहिल्या पत्नी जयश्री यांनी मेहेंदी भूमिका केली, त्यांचा नायक होता अजित. अजितने डान्स केलेल्या चित्रपटाचे नाव-मिस बॉम्बे. यामध्ये दिन हो या रात…….’  या गाण्यात नलिनी जयवंत बरोबर त्याने डान्स केला. तसेच नया दौरमध्ये तो दिलीपकुमार बरोबर ये देश है वीर जवानोंका……. ‘ या गाण्यात नाचला आहे.

                    महिपाल हा नट कवीही होता. त्याची काही गाणी रफीने म्हटलीत. रफीचे प्रसिद्द गाणे-‘ तेरे दुनियासे दूर चले होके मजबूर, हमे याद रखना……’जबक(१९६१) यास संगीत होते चित्रगुप्त यांचे  वो जब याद आए, बहुत याद आये……..’ हे प्रसिद्द गीत आहे पारसमणी(१९६३) मधील. रफीने ते लता मंगेशकरबरोबर गायले आहे. याचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते.

                   गुरुदत्त निर्माता-दिग्दर्शक, नट डान्सर होता. अलमोडा येथे उदय शंकरच्या टीममध्ये तो काम करत होता. पुण्यात प्रभात कंपनीने एका चित्रपटासाठी त्याला आणले. पण तेथे नृत्यप्रधान चित्रपट झाल्याने त्याला वाव मिळेना. मग तेथे पी. एल. संतोषी विश्राम बेडेकरांचा तो सहाय्यक दिग्दर्शक बनला. त्यानंतर १९४५ च्या लाखा राणी गुरुदत्तने नायकाची भूमिका केली. दिग्दर्शक होते विश्राम बेडेकर, तर नायिका होती मोना देसाई. नंतर १९५१ मध्ये बाजीचित्रपटाचा तो दिग्दर्शक बनला. १९५२  त्याने जालकेला. १९५३ मध्ये बाझची निर्मिती केली कामही केले. आरपार(१९५४)-मध्ये रफीने गुरुदत्तच्या तोंडी मुहोब्बत करलो, जी भरलो, अजी किसने रोका है…., सून सून जालीमा हमको तुमसे हो गया……..’ ही गाणी गायलीत.संगीतकार .पी. नय्यर होते. १९५३ नंतर गुरुदत्तने बारा चित्रपटात भूमिका केल्या.

                रफीबरोबर सर्वात जास्त गीते गायिलेल्या गायिका आशा भोसले होत्या.

       लता दीदी व महंमद रफी यांचेमध्ये काही काळ थोडेसे वितुष्ट झाले होते. कारण होते रॉयल्टीचा मुद्दा. रफीने निर्मात्यांची बाजू धरली. ठरलेले पैसे मिळाल्यावर तो रॉयल्टी घ्यायचा नाही. तो निर्मात्याचा हक्क आहे म्हणायचा.

                सुमन कल्याणपूर रफीचे गाणे-दिल एक मंदिर(१९६३)-जाने वाले कभी नही आतेदिल एक मंदिर है, प्यार की जीसमे होती है पूजा….याचे संगीतकार होते शंकर जयकिशन.

                एकूण १४१ गाणी रफीनी सूमन कल्याणपूर यांचेसह गायली आहेत.

                मुबारक बेगम यांचा प्रथम चित्रपट होता १९४१ मध्ये यातील प्रसिद्ध गीत-‘ आइये…….’ तसेच   मुझको अपने गले लगालो, मेरे हमराही, तुमको क्या बतलाऊ मै……’ चित्रपट-हमराही(१९६३). शंकर जयकिशन यांचे संगीत होते.

                 गायिका मीना मंगेशकर यांचे रफीसह गीत चित्रपटांतून गायिले गेलेय. पहिले १९५८ च्या सिंदबाद की बेटेया चित्रपटामधील होते.

                उषा मंगेशकर यांचे बरोबर २३ गाणी रफीनी गायलीत. त्यापैकी प्रसिद्द गीते आहेत शिर्डी के साईबाबा(१९७७) मधील, ‘  तुही फकीर तुही है राजा….., साईनाथ तेरे हजारो हाथ…. याचे संगीतकार होते पांडुरंग दीक्षित.

                आशा, किशोर रफीचे जानू मेरी जान, मै तेरे कुर्बान, मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्थान…..’ चित्रपट आहे शान’(१९८०) आणि संगीतकर आहेत आर.डी.बर्मन.

                 रंग जमाके जायेंगे, रंग जमाके जायेंगे-नशीब(१९८१)-हे किशोर, आशा, शैलेंद्र सिंगसह रफीने गायले होते संगीत लक्ष्मी प्यारेलाल यांचे होते.

                रफी हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतातील दोन गाणी गायला होता.

                मुकेश १९४१ पासून या क्षेत्रात गायक नट बनायला आला. १९४१ च्या निर्दोषमध्ये त्याने भूमिका केली. नंतर दोन चित्रपट केले, त्यात मुकेशला यश मिळाले नाही. ‘उस पार’(१९४४) या चित्रपटापासून मुकेश पार्श्वगायक बनला १९४५ च्या पहली नजर मधील दिल जलता है…..’ पासून तो लोकप्रिय पार्श्वगायक झाला. 

                 मुकेश रफीचे पहिले एकत्रित गाणे  १९४९ च्या चित्रपटात-‘ चिल्मन जले जलानेवाले हमको...….’, हे गायले गेलेय. मुकेशने १९४६ ला बचीबेन या गुजराती तरुणीशी विवाह केला.

                  लता, मुकेश सह रफीचे हे गीत रमय्या  वत्सा वय्या…….’ १९५५ च्या श्री ४२०मध्ये शंकर जयकिशन यांच्या संगीतावर गायले गेले आहे.

                  रफी किशोरकुमारची एकूण ५९ गाणी होती, तर मन्ना डे बरोबर रफीने ११६ गाणी गायली आहेत.

                  १९८६ च्या लव्ह अँड गॉडमध्ये नौशादच्या संगीतात रहेगा तेरा जहाँमे नाम, बनेंगे तेरे बिगडे काम, हमे कुच्छ राह खुदा दे दे…….’ या गाण्यात रफी, तलत, मन्ना डे, खान मस्ताना, हेमंत कुमार, एस. बलबीर, सुमन कल्याणपूर हे गायक होते. तलत महमूद यावर गमतीने म्हणाला होता, ‘ या गाण्यात आम्हा साऱ्या गायकांचा आवाज कोरस वाटावा इतकी आवाजांची गर्दी झालीय.’

                   चंद्रशेखर गाडगीळ बरोबर रफी १९८१ च्याहरजाईमध्ये, ‘ तेरा सूर सितारोमे, हार जलवा तेरा जलवा….’ हे गीत गायला आहे. त्याचे संगीत आर.डी.बर्मन यांचे होते.

                   सुलोचना चव्हाण बरोबर १९५१ च्या दशावतार-ढोलकमद्ये  रफी दोन गाणी गायला होता. संगीत होते अविनाश व्यास यांचे. सुलोचना यांचे लग्न १९५५ च्या कलगीतुराचे दिग्दर्शक शामराव चव्हाण यांचे बरोबर झाले.

                    अनुराधा पौडवाल रफीबरोबर प्रथम डाकू और जवानमध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालच्या संगीतात गाणे गायली आहे.

                     रफीने साधारणतः ५००० गाणी गायली आहेत. १९४४ ते १९८० पर्यंतची महंमद रफीची सांगीतिक वाटचाल सुमारे ३६ वर्षांची होती.

                      रफीचे पहिले गाणे १९४४ च्या गुलबलोचया पंजाबी चित्रपटात होते. ‘ सोणिये नी हीरीये, नी तेरी याद सताय…...’ याचे संगीत शामसुंदर यांनी दिले होते.

                       हिंदीत रफीचा पहिला चित्रपट होता, ’गाव की गोरी’(१९४४) त्यातले अजी दिल हो काबूमे, तो दिलदार की ऐसी तैसी…...कोरस जी. एम. दुरानी यांचा होता तर, संगीत शामसुंदरनी दिले होते.

                       रफीचे शेवटचे गीत आसपास मध्ये होते. त्याचे संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. ‘  तेरे आनेकी आस है दोस्त, शाम क्यू उदास है दोस्त, महकी महकी फिझा क्या है, तू कही आसपास है दोस्त….’याचे रेकॉर्डिंग २८//१९८० रोजी झाले होते.

                        संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची ३६९ गाणी रफीने गायली आहेत. त्यातील, ‘ रोशन तुम्ही से दुनिया, रौनक तुम्ही जहाँ की, फुलो मे पलनेवाली, रानी हो गुलीसतो गुलिशतोंकी….….’ हे पारसमणीमधील एक प्रसिद्द गीत होते. तसेच, फिल्मफेअर एवॉर्ड चाहुंगा मै तुझे सांज सवेरे…..या दोस्ती(१९६४)मधील गीतास मिळाले.

                        रफीनी शंकर जयकिशन यांचेकडे ३४१ गाणी गायली होती. त्यापैकी बरसातमधील, ‘ मै जिंदगीमे हरदम रोता ही रहा हूं………..’  हे पहिले गाणे गायले होते आणि त्यांच्या तेरी प्यारी प्यारी सुरत को………’ या ससुराल(१९६१) आणि  बहारो फुल बरसाओ……’ चित्रपट सूरज’(१९६६), ‘ मै गाऊ तुम सो जाओ…….…’ चित्रपट ब्रम्हचारी’(१९६८) या सुमधुर गीतांना फिल्मफेअर एवॉर्ड मिळाली आहेत.

                       संगीतकार चित्रगुप्त साठी २४७ गाणी रफी गायला आहे.

                       रफीला प्रथम फिल्मफेअर १९६० मध्ये चौदहवी का चांदमधील चौदहवी का चांद हो, या आफताब हो……या गीतासाठी मिळाले. या गीताचे संगीतकार होते रवी. राष्ट्रीय पारितोषिकही पहिल्यांदा रवीच्या संगीतावर रफीला मिळाले होते.

                        संगीतकार .पी. नय्यर बरोबर रफी १९७ गाणी गायला आहे.

                        नौशाद करीता रफीनी १४९ गाणी गायली आहेत.

                        रफीनी आर.डी. बर्मन साठी १२२ गाणी गायली आहेत.

                        उषा खन्ना यांनी संगीत दिलेली १४४ गाणी रफीची आहेत. यापैकी प्रसिद्ध गाणे आहे-‘ दिल देके देखो, दिल देके देखो…….’ चित्रपट आहे दिल देके देखो’(१९५९).

                        किशोरकुमार बरोबर रेकॉर्डिंग करताना रफी चांगल्या मूडमध्ये असायचा, तर लता मंगेशकर बरोबर असताना सावध असायचा. त्यांचेशी अदबीने वागायचा.

                      रफी मन्ना डे यांच्याविषयी सुद्दा  आदर बाळगायचा.

                     पुष्पा पागधरे एकदा प्रथमच रेकॉर्डिंगला आलेली होती. पण रफीने मोकळेपणाने बोलून तीचा ताण घालविला.

                     सुरेश वाडकरचे गाणे रेडिओवर ऐकल्यावर रफीला त्याचा आवाज, ‘ आता रॉ वाटला, तरी बेस चांगला आहे, तो हळूहळू पॉलिश होईल ‘,......अशी प्रतिक्रिया रफीने जहीरला(रफीचे नातेवाईक व्यवस्थापक) ऐकवली.

                     ललीता देऊळकर(सौ.सुधीर फडके) यांचे बरोबर रफीने काही गाणी गायली आहेत. त्या रफीला सिनिअर होत्या. त्यामुळे रफीला रेकॉर्डिंगच्या वेळी ताण यायचा. ‘साजनमध्ये तुम हमारे हो हो, हमको तुम्हाराही आसरा…….’ या गाण्याच्या वेळी ललीताबाईंनी रफीला सावरून घेतले होते. नंतर सुधीर फडकेंच्या संगीतावर रामानंद सागर निर्मित-‘दरारचित्रपटाचे वेळी रफी रिहर्सलसाठी सुधीर फडकेंच्या घरी गेला. तेथे चांगला पाहुणचार करून चकली, डिंक लाडू  ललीताबाईनी रफीला खायला घातले. रफी ती आठवण सांगायचा.     

                     संगीत कारकिर्दीला प्रारंभ करताना आपलं पहिल्या चित्रपटातलं गाणं लतानी गावे, अशी इच्छा संगीतकार .पी. नय्यर यांनी व्यक्त केली होती. पण चार पाच वेळा जाऊनही  त्यांना ताटकळत ठेवले गेले. शेवटी वैतागून .पी. नी त्यांचा नाद सोडला आणि निश्चय केला की, त्यांच्या शिवाय इतरांना घेऊन गाणी करायची.              

                     रफीचे मन गोरगरिबांविषयी किती विशाल होते, याची आठवण अण्णा चितळकर(सी. रामचंद्र) यांनी लेखकास सांगितली, ती अशी आहे-

                     रफीला एक डायलेलीस मशीन आणायचे होते भारतात. गरजू गरिबांना आजारपणात या मशीनचा मोठा उपयोग होणार होता. त्या काळी डायलेलीस मशीन गरीबांना पैशांअभावी परवडत नव्हते. म्हणून एखाद्या हॉस्पिटलला ते मशीन दान करायचे रफीने ठरवले होते.

                     गरजू संगीतकार, गायक-वादकांना रफी दरमहा मदत करायचा. त्याची यादी रफीनी केली होती. दरमहा २८ तारखेला प्रत्येकाचे पाकीट तयार करून, तारखेला त्या पाकिटात पैसे भरून ठेवण्याची रफी जहीर मार्फत(रफीचे नातेवाईक व्यवस्थापक) व्यवस्था करायचा.

                    तारखेला ती पाकिटे घेऊन जाणाऱ्या मंडळींची रांग रफी व्हीलासमोर लागायची. रफी जहीर नसले की रफीची पत्नी बेंजीच्या कडून गरजूना पाकिटे मिळायची. जवळपास २८ हजारांचे दान तो दरमहा करायचा.

                    रफीला डायबिटीसचा आजार वीस वर्षांपासून होता. मात्र खाण्यापिण्याचे निर्बंध पाळायला रफीला जमत नव्हते. ते पाळताना रफी वैतागायचा. दिवसभर उभा राहून, ‘  गाणं हे मेहेनतीचे काम आहे. माझ्या  खाण्यावर निर्बंध आणून ही मेहेनत करायला मला ताकद कशी मिळणार ?’,  असे रफी  घरच्यांना विचारायचा.

                    ३० तारखेला(जुलै-१९८०) सकाळी रफीच्या छातीत दुखू लागले. पण हा गॅसचा त्रास असेल असे रफीला वाटले. त्या दिवशी रफीनी ठरलेली औषधाची गोळी घेतली, तरी त्याची कळ थांबेना. मग डॉक्टरला बोलवायला सांगितले. डॉक्टर आले, रफीला तपासल्यानंतर डॉक्टरांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये रफीला  ऍडमिट व्हायला सांगितले.

                    नॅशनल हॉस्पिटलमध्ये  रफीची तपासणी झाली, तेव्हा रफीला हार्ट ऍटॅक आल्याचे निश्चित झाले. तेथून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये लगेच नेण्यात आले. पण उशीर झाला होता.

                    सर्वांचा लाडका गायक आणि भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये सर्वोत्तम ठरलेला गोड गळ्याचा गायक महंमद रफी वयाच्या पंचवन्नव्या वर्षीच स्वर्गस्थ झाला होता.

💐महंमद रफीची लोकप्रिय गाणी त्यांचे विशेष💐

*पुकारता चला हूं मै, गली गली बहारकी, बस एक छाव जुल्म की, बस एक निगाह प्यार की….,    

*हम दम मेरेमान भी जाओ, कहना मेरे प्यार का, अरे हलका हलका….

*हुये है तुमपे आशिक हम, भला मानो बुरा मानो….,

--संगीत- पी नय्यर-चित्रपट-मेरे सनम(१९६५).

*अफू खुदा, खुदा, खुदा…… वाह वाह, तुमको, हमपे, प्यार आया……

*परदेसीयोंसे ना, अखियां मिला ना….

*ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इन्कार मगर इकरार…..

*एक था गुल और एक थी बुलबुल, दोनो चमन मे रहते थे…..

*यहा मै अजनबी हूं, मै जो हूं, बस वही हूं……,

--चित्रपट-जब जब फुल खिले(१९६५) संगीत-कल्याणजी आनंदजी-याचा रिमेक चित्रपट-राजा हिंदुस्तानी(१९९६).

*चले थे साथ मिलकर, चलेंगे साथ मिलकर, तुम्हे रुकना पडेगा, मेरी आवाज सूनकर…..-हसीना मान जायेगी(१९६८).

*यु रुठो ना हसीना, मेरी जान पे बन जायेगी….-चित्रपट-नींद हमारी ख्वाब तुम्हारे(१९६६)-संगीत-मदन मोहन.

*लिखे जो खत तुझे, वो तेरी याद मे…….-संगीत-शंकर जयकिशन-चित्रपट-कन्यादान(१९६८).

*चले जा, चले जा, चले जा, जहाँ प्यार मिले...-जहाँ प्यार मिले(१९६९).

*थोडा रुक जायेनी तो तेरा क्या जायेगा, नैन भर देख लेंगे, चैन जायेगा, कामिनी….चित्रपट-पतंग(१९७१).

*मस्त बहारों का मै आशिक, मै जो चाहे यार करू, चाहें गुलो के साये से खेलू, चाहे कली से…..चित्रपट-जंगली(१९६१).

*एक बेचारा, प्यार का मारा, राहो तेरी देख पडा है जलते जाना…..-चित्रपट-वारीस(१९६९).

*दिवाना मुझसे नही, इस अंबरके नीचे…..-संगीत-आर.डी. बर्मन-चित्रपट-तिसरी मंझिल.

*चढती जवानी मेरी चाल मस्तानी, तुने कदर ना जानी रामा, कितना प्यारा वादा है इन मतवाली  आंखों कां, इस मस्तीमे….-चित्रपट-कारवां-संगीत-आर.डी.बर्मन.

*आशा बरोबर रफीने गायलेले-पल दो पल साथ हमारा पल दो पल के याराना है, इस मंझिल पर मिलने वाले

 बरनिंग ट्रेन(१९८०).

*किशोर आशासह रफी-मिले जो कडी कडी एक जंजीर बने, के रंग भरो जिंदा तसविर बने…..-चित्रपट-कसमे वादे(१९७८)-संगीत-आर.डी. बर्मन.

*तेरे दरपे आया हूं, कुच्छ करके जाऊंगा, झोली भरके जाऊंगा, या मरके जाऊंगा….....चित्रपट(लैला मजनू(१९७५).

*किशोर आशासह -शबाब पे मैने जरासी शराब…., परदा है परदा है, परदेके पिच्छे परदा नही है…., तैयब अली प्यार का दुष्मन हाय हाय, तारीफ तेरी निकली है, शिर्डी वाले साईबाबा, देख के तुमको दिल डोला है….-मुकेश, किशोर, लता, परवीन सह रफी-अमर अकबर अंथोनी(१९७७)-संगीत मदनमोहन जयदेव.

*रामजी की निकली सवारी, रामजी की लीला है….हम तो चले परदेश हम परदेसी हो गये, परबत की इस पार, परबत के ऊस पार, गुंज उठी छम छम…,कोयल बोली, दुनिया डोली, डफली वाले डफली बजा…-सरगम.

*दर्द दिल, दर्द जिगर, दिलमे जगाया आपने, पहले तो मै शायर था, आशिक बनाया आपने…-कर्ज(१९८०).

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचे राष्ट्रीय पारितोषिक-१९७७-

*क्या हुआ तेरा वादा ?..., चांद मेरा दिल चांदनी होरफी आशाचे-ये लडका हाय कैसा है दिवाना, कितना मुश्किल है देखो इसको समझाना, है अगर दुष्मन दुष्मन जमाना, गम नही गम नही,….हम किसी से कम नही कम नही…. चित्रपट-हम किसी से कम नही-संगीत-आर.डी.बर्मन.

*ये फूट, चल फुटना,……… या अमिताभ बच्चनच्या आवाजावर रफीचे गीत-चल मेरे भाई तेरे तुझे हाथ जोडता हूं, हाथ जोडता हूं तेरे पांव पडता हूं…… नसिब(१९८१).

*रफीसह शमशाद, आशा--रमय्या वत्ता वय्या, रमय्या वत्ता वय्या-श्री ४२०.

*रफी, महमूद इतर यांचे-सज रही गली मेरी माँ, सूनहरी गोठेमे….. कुंवारा बाप(१९७४)-संगीत-राजेश रोशन.

*मेहमूद रफीच्या आवाजात-हम काले हो तो क्या हुआ, दिलवाले है, हम तेरे तेरे चाहने वाले है…-गुमनाम(१९६५).

*मै अपने आपसे घबरा गया हूं, मुझे हे जिंदगी दिवाना करदे…..-बिंदिया(१९६०)-

*मुहोब्बत जिंदा रहती है, मुहोब्बत मर नही सकती……-प्रेमनाथचा चंगेझ खान(१९७५)-संगीत-हंसराज बहाल.

*सुहानी रात ढल चुकी…..,-संगीत-नौशाद-दुलारी(१९४९)-नायक सुरेश.

*अब रात मिलनकी बीत चुकी, ये खेल बिघडने वाला हैजादू(१९९५)-संगीत नौशाद-नायक सुरेश.

*चली चली रे मेरी पतंग चली रे, चली बादलोंके पार, होके डोर पे सवार…. भाभी-१९५७-संगीत चित्रगुप्त-नायक जगदीप.

*हा माझा मार्ग एकला(१९६३) हिंदीत जिम्बा का बेटा(१९६६)-यात मा. सचिन बाल कलाकार म्हणून पहिल्यांदा पडद्यावर आला-त्याची गाणी रफीने गायलीत.

*आया रे खिलौनेवाला खेल खिलौने लेकर आया रे…..बचपन(१९७०).

*मै गाऊ तुम सो जाओ, सुख सपनोमे खो जा…...ब्रम्हचारी(१९६८).

* फिरकी वाली, तू कल फिर आना, फिर नही जाना, तू अपनी जुबान से……राजा और रंक(१९६८)-नायक संजीवकुमार-संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल.

*जाने वालो जरा, मुडके देखो मुझे, एक इन्सान हूं, तुम्हारी तऱहा....,राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है, कोई जब राह पाये, मेरे संग आये के पगपग दीप जला , मेरी दोस्ती मेरा प्यार, चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मै दुन्गा…..-दोस्ती(१९६४)-संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल पडद्यावर सुधीरकुमार या बाल कलाकाराने गायली आहेत.

*देखी जमानेकी ये यारी, बिछडे सभी बारी बारी…..कागजके फुल(१९५९)-दिग्दर्शक नायक-गुरुदत्त-संगीत-एस.डी. बर्मन.

*हम बेखुदी मे तुमको पुकारे, चले गये…....काला पानी(१९५८).

*प्यासा(१९५७)-यात संगीत-एस.डीं.चे पण संगीत रचना आर.डी.बर्मन यांची होती. ते रफीचे गाणे जॉनी वॉकर याने प्यासा स्वतःच्या आवाजासह गायले(हा गंभीर चित्रपट होता तरी)-मालीश तेल मालीश, चंपी मालीश…,सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाये…,ये महलो ये तखतो तख्तओ ये ताजोकी दुनिया, ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…..

*मेरा मन तेरा प्यासा, मेरा मन तेरा, पुरी कब होगी आशा….गॅम्बलर(१९७१)-संगीत-एस.डी. बर्मन.

*लतासह रफी-तेरी बिंदीया रे, हाय हाय तेरी  बिंदीया रे...अभिमान(१९७२)-संगीत-एस डी बर्मन.

*रेखा ओ रेखा जबसे तुमे देखा…..अधिकार(१९७१)-एस.डी. बर्मन.

*आगे बढो(१९४७)-संगीत-सुधीर फडके-नायक देवानंद, नायिका खुर्शीद-यातही रफी गायला आहे.

*एस.डी. यांनी संगीत दिलेल्या ४१ चित्रपटात रफीने ९६ गाणी गायलीत.

*ये जिंदगी के मेले दुनिया मे कम होंगे, अफसोस कम ना होंगे-मेला(१९४१)-संगीत-नौशाद.

*मान मेरा एहसान अरे नादान-आन(१९५२)-संगीत-नौशाद.

*मुहोब्बत की राहोमे चलना संभलके, दूर के मुसाफिर, हम को भी साथ ले ले….उडनखटोला(१९५५)-संगीत-नौशाद.

*मधूबन मे राधिका नाचे रे…..कोहिनूर(१९६०)-संगीत-नौशाद.

*लागा गोरी गुजरिया से, नैन  लढ गयी है तप मनवामा गंगा जमुना.....(१९६४)-संगीत-नौशाद.

*अपने आझादी को हम हरगिझ मिठा सकते नही….लीडर(१९६४)-संगीत-नौशाद.

*आज की रात मेरे दिल की सलामी लेले…..राम और शाम(१९६७)

*आज पुरानी राहो से कोई मुझे आवाज दे…..आदमी(१९६८)

*मेरे पैरो मे घुंगरू बंधा दे…..संघर्ष(१९६८)

* मुहोब्बात झिंदाबाद-एम. कुमार चरित्र अभिनेता यावर चित्रित-चित्रपट-मोगल--आझम.

*यह देश है वीर जवानो का-नया दौर(१९५७).

*सुख के सब साथी दुःख मे कोय, मेरे राम मेरे राम....गोपी(१९७५)-संगीत-कल्याणजी आनंदजी.

*तू हिंदू बनेगा मुसलमान बनेगा इन्सान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा-धुल का फुल(१९५९)-दिग्दर्शक-यश चोप्रा-गीत साहिर लुधियानवी यांचे एन दत्ता यांचे संगीत.

* वतन, वतन, हम को तेरी कसम, जलते भी गये, कहते भी गये-दोन भागाचे गाणे-शहीद(१९६५).

*सुनो सुनो ये दुनिया वालो बापू की ये अमर कहानी... लघुपट-बापू की अमर कहानी-राजेंद्र कृष्ण लिहिलेले हुस्नलाल-भगतरामचे संगीत.

*वतन पे जो फिदा होगा, अमर वो नौजवां  होगा-संगीत-कल्याणजी आनंदजी-चित्रपट फुल बने अंगारे(१९६३).

*कर चले हम फिदा जान साथीयो, अब तुम्हारे हवाले वतन साथीयौ…..हकीकत(१९६४)-संगीत-मदनमोहन.

*लीडर(१९६४)-नौशाद-अपनी आझादी को हम हरगिझ मिठा सकते नही, सर कटा सकते है लेकिन-लीडर(१९६४)-संगीत-नौशाद.

*जहाँ डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा….सिकंदर आझम(१९६५).

*नफरती काठी तोडो, देशप्रेमीयौ आपसमे प्रेम करो-संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल-देशप्रेमी(१९८२).

*नाचे मन मोरा मगन तिग दाधि गी-रफीचे गीत-तबला सामता प्रसाद-नट अशोककुमार, </