दोन विशेष विदेशी चित्रपटांविषयी मला येथे लिहायचे आहे. ‘सेराफिना’ आणि ‘क्राय, द बिलव्हड् कंट्री’ हे दोन्ही जुने गाजलेले चित्रपट आहेत. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय नेते नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांनी वर्णभेदाशी सामना करीत गोऱ्यांच्या राजवटीविरुद्ध उठाव करून स्वातंत्र्य मिळविले. माणसामाणसांत काळागोरा भेद मांडणारे गोरे लोक व त्यापायी अन्याय सहन करणारे आफ्रिकन नागरिक, यांचे आनंदी व दुःखी जीवन या दोन्ही चित्रपटांमध्ये चित्रीत केलेले आहे………. 🌹सेराफिना🌹 ‘सेराफिना’ ही फिल्म म्हणजे आफ्रिकन स्वातंत्र्याची आस लागलेल्या स्थानिक देशवासीयांचा करूण आक्रोश आहे. नेल्सन मंडेलाना देवतुल्य मानणारी जनता गोऱ्यांच्या जुलूमाला कंटाळली आणि त्यांनी बंड केले. कितीतरी जणांचे यात बळी गेले. हा स्वातंत्र्य लढा १९८६ पर्यंत चालू होता. जोषपूर्ण डान्स करीत चित्रपट ना...
आपल्या देशात असंख्य पवित्र देवस्थाने अशी आहेत की जिथे पर्यटकांची आणि भाविकांची वर्षभर वर्दळ असते. ही वर्दळ इतकी वाढते की देवस्थानच्या प्रशासनाला सुरक्षा व्यवस्थेचा ताळमेळ घालताना नाकी नऊ येते. यावर उपाय म्हणून काही देवस्थाने दर्शनासाठी टोकन–कूपन वितरित करतात, कुठे ऑनलाइन बुकिंग सुरू होते. काही देवस्थानचे प्रशासन संधी साधून यातून उत्पन्नाचा मार्ग निवडते ! श्रीतिरुपती बालाजी संस्थान पूर्वापार सशुल्क दर्शन घडविते. आता शिर्डी संस्थानने देखील भाविक दर्शनार्थींचे गट तयार केले असून त्यांचेकडून आगाऊ शुल्क घ्यायला प्रारंभ केल्याचे वृत्त आहे. अशी आणखीही देवस्थाने असतील. मात्र काही देवस्थाने याला अपवाद आहेत. महाराष्ट्रात शेगावचे श्रीगजानन महाराज देवस्थान सर्व भाविकांना विनामूल्य व समानतेने दर्शन घडविते. पुरी(ओरिसा) येथील श्रीजगन्नाथ हा देखील सर्वांना विनामूल्य दर्शन देतो. निदान आजपर्यंत तरी ही स्थिती आहे. उद्याचे काही सांगता येणार नाही ! कारण देवदेवतांच्या हातात काहीच नसते. ते बिचारे मुक...
“ दसऱ्याला आपण पानांचे सोने वाटतो. या सोन्याचा का कधी दुष्काळ पडेल ? पिवळे सोने कमी होईल. हृदयाची श्रीमंती असेल तर सारे सोनेच आहे. ” साने गुरुजी. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Comments
Post a Comment