Posts

Showing posts from October, 2024

🌹🌹चला कोकणात🌹🌹

Image
                   निसर्ग सुंदर कोकण सर्वच पर्यटकांना आकर्षित करते. नितांत सुंदर समुद्र किनारे अवलोकन करताना दर्दी पर्यटकांना जूनी देवालये, स्वराज्यकालीन दुर्ग, प्राचीन गुंफा व कातळशिल्प सुध्दा आकर्षित करतात.                      मात्र कोकणातील दुसरी बाजू काहीशी वेगळी आहे. ठाण्यापासून थेट सिंधुदुर्ग पल्याड पसरलेल्या विस्तीर्ण कोकणप्रांतात इतर भागांच्या तुलनेने विकासाची गती घेतलेली नाही.  का ?, तर मानवी स्वभाव प्रवृत्ती ! हे वाचायला विचित्र वाटेल, पण ही सत्य परिस्थिती आहे. जागा- जमिनी- इस्टेटीले वाद, कोर्ट कज्जे, भ्रामक अंधश्रध्दा, संकुचितपणा, आणि धाडसी वृत्तीचा अभाव या गोष्टी कोकण विकासाला मागे ठेवण्यास कारणीभूत आहेत.                      पण याला काही अपवाद आहेत बरं का !                      तेच आपण जाणुन घेऊया……….. 🌹🌹ग्लोबल कोकण🌹🌹       ...

🌹🌹सुंदर माझे घर🌹🌹

Image
                     प्रामुख्याने नगर-शहरात राहणारी माणसं निवासासाठी सुरक्षित वास्तू असावी म्हणून घर घेतात. हे घर घेणे सहज सोपे नसते. कुणी कर्ज काढून घर घेते, तर कुणाला वाडवडीलांच्या वाटणीतले घर मिळते. यातील बहुसंख्य माणसं सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत स्थानापन्न होतात.  हे घर आपलेच असले तरी ते सोसायटीच्या अधिपत्याखाली असते. अर्थात, आपल्या घराची खरी मालकी सोसायटीकडे असते. सोसायटीचे सभासद  सगळा कारभार सांभाळतात.  या जबाबदारीमध्ये ‘आपलेपणा’ मात्र असावयास हवा.                      या भावनेतूनच हा शब्द संवाद सोसायटीच्या जाणत्या सभासदांसाठी…………… 🌹आपले घर आपली सोसायटी🌹                   व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने सोसायटीचा  कारभार सुरू असतो. कुठे आदर्श सोसायटी निर्माण होते, तर कुठे गडबड  घोटाळा  करणाऱ्या  सभासदांमुळे  सोसायटीची  वाताहात  होते.        ...

🌹🌹सुविचार – काव्यकण🌹🌹

Image
                              ज्ञानाजवळ विज्ञान पाहिजे. विद् म्हणजे जाणणे, ज्ञान जवळ करणे, समजून घेणे त्याला विज्ञान असे म्हणतात. विश्वाच्या पोटात कितीतरी गोष्टी आहेत, पण त्या आम्हाला माहीत नाहीत. या सर्व गोष्टी समजून घेणे, यालाच विज्ञान असे म्हणतात.                                  - सद्गुरू ब्रम्हेशानंदाचार्य स्वामीजी - तपोभूमी, गोवा.                                    ::::::::::::::::::::::::::::