💐💐वाचनछंद💐💐

मुंबईतील जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या ‘ एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई ‘ या संस्थेच्या अभ्यास दालनात तासनतास ग्रंथ वाचन व अभ्यास करणाऱ्या दुर्गाताई भागवताना पाहण्याचे भाग्य मला पुर्वी अनेकदा लाभले. ही थोर विदुषी अधून मधून चहा-कॉफी प्यायला कॅन्टीनमध्ये देखील दिसायची. त्यावेळी तेथल्या कर्मचाऱ्यांशी औपचारिक बोलणे सोडले तर दुर्गाताई अबोल व्यक्तिमत्वाच्या लेखिका होत्या. दुर्गाताईंचे प्रसिध्द पुस्तक ‘पैस’ व ‘ऋतुचक्र’ माझ्या परिचयाचे होते. त्यापैकी ‘ऋतुचक्र’ या पुस्तकाविषयी थोडे सांगत आहे…….. 💐ऋतुचक्र – एक सुंदर साहित्य लेणे💐 लेखिका – दुर्गा भागवत, प्रकाशक – पॉप्युलर प्रकाशन. मराठी साहित्यसृष्टीतील मान्यवर लेखकांच्या मांदियाळीमध्ये दुर्गा भागवतांचे नाव अग्रस्थानी आहे. चिकित्सक वृतीच्या दुर्गाताई भागवतांनी विविध विषयांवर विपुल लेखन केलेले आहे. लोककला, इतिहास, तत्वज्ञान, निसर्ग, भारतीय संस्कृती, धर्म इत्यादी विषयांवरील त्यांची मराठी तसेच इंग्रजी भाषेतील पुस्तके प्रसिध्द आह...