💐💐चित्रपट गप्पा💐💐

आज एका बांगलादेशी चित्रपटाविषयी माहिती देत आहे. प्रभात आयोजित कार्यक्रमात हा चित्रपट मला पाहायला मिळाला……….. 💐जलाल स्टोरी(बांगला देश-२०१४)💐 दिग्दर्शक – अबू शाहिद इमान. परंपरा सांभाळणारे अज्ञानी ग्रामस्थ आणि बाईला नगण्य स्थान देणारी पुरुषप्रधान संस्कृती, यांभोवती फिरणारे ‘जलाल स्टोरी’ चे कथानक आहे. या चित्रपटात तीन प्रमूख घटना घडतात. पहिल्या घटनेत, एका गावाजवळून वाहणाऱ्या नदीच्या संथ प्रवाहात गावकऱ्यांना पाण्याचे घंगाळ(भांडे) तरंगताना दिसते. गावकरी कुतूहलापोटी ते घेतात. त्यामध्ये छोटेसे गोंडस लहान मुल असते ! या बेवारस लहान मुलाचे काय करायचे ? हा प्रश्न जमलेल्यांना पडतो. तेथे एक प्रौढ गावकरी उपस्थित असतो. गरजू लोकांना मंतरलेले पाणी देणे हे त्या दैनंदीन काम. तो गृहस्थ लहान मुलाला स्वतःकडे घेतो व आपल्या घरी नेतो. लहान मुलाचे नाव जलाल ठेवले जाते. घरातील पत्नीला मात्र नवऱ्याने मुलाला घरी आणलेले पटत नाही. ती नवऱ्याल...