Sunday 1 January 2023

  💐💐मित्रांगण💐💐

                   हे मित्रांगण फार मोठे नाही, आणि छोटेही नाही. आज यातले काही मित्र स्वर्गस्थ झालेत. पण ते अजून स्मरणात राहिलेत. आयुष्याच्या वाटचालीत सगेसोयऱ्यांनी मित्र मंडळींनी नेहेमी साथसंगत केलीय,  आधार दिलाय. काहींचे खट्टे-मिठे अनुभवही  मिळालेत. त्यातुन काय घ्यावे, काय टाकावे हे ठरवत पुढे मार्गक्रमण करीत राहिलोय.

                  या  मित्रांगणात काही मित्र आजही येतात, वावरतात अन संवाद साधतात. त्यातील निवडक पंचवीस मित्रांविषयी हे प्रांजळ मनोगत लिहिले आहे. मात्र  त्यांची नावे येथे देत नाही………..

 

💐मित्र पंचविशी💐

*--आपत्तीमध्ये याने मला आसरा दिलाय. हा मदतशील चांगला मित्र आहे.

*हाही वेळेला धावून आलाय, सगळे अनुभव घेतलेला हा मित्र, पण याचा स्वभाव थोडा घाबरट आहे.

*रा(स्वर्गस्थ)--वेडीवाकडी भटकंती करणारा साहसी मित्र. भरपूर बडबड्या पण विक्षिप्त स्वभावाचा. काही वर्षांपूर्वी    

                         अचानक हृदयविकाराचा झटका आला स्वर्गस्थ झाला.

*सुहा शालेय मित्र. इतरांना दिशा देणारा त्यांच्यावर प्रभाव टाकणारा, धार्मिक गूढ विद्या अवगत असलेल्या    

         या मित्राचे संघटन कौशल्य चांगले आहे.

*दे--व्यवहारात चतुर पण स्वभाव बिनभरवशाचा असा हा मित्र.  

*प्र--मैत्रीसाठी काहीही करणारा. भडक डोके फटकळ बोलण्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेणारा मित्र.

*गोवयाने हे जेष्ठ आहेत. यांचा स्वभाव आतल्या गाठीतला असून डिफेन्सीव्ह आहे, त्यामुळे चार पावलं  मागे

           असतात. आपल्यालाच कसे यश मिळत नाही ?, अशी यांची कायम तक्रार असते.

*दि--दिलखुलास पण फटकळ स्वभावाचा मित्र. समाजाशी देणेघेणे नसलेला, काहीसा रंगेलही आहे.

*याच्याशी कॉलेजमध्ये मैत्री झाली. डॅशिंग पर्सनॅलिटी, पण कोणा तरुणीच्या प्रेमात पडल्यावर अवसान गळून     

          गेलेला. हा मित्र आता संपर्कात नाही.

 *चंहा पण कॉलेजचा मित्र. स्वभावाने व्यवहारी. सेल्फ डिफेन्समध्ये अत्यंत हुशार, कठीण प्रसंगी मदतीची अपेक्षा    

          असताना अलगदपणे दूर जाणारा.

*नॉ--(स्वर्गस्थ)-भोळसट स्वभाव पण कॉलेजमधील एका मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडून वेडा झालेला मित्र.

*पा- हरहुन्नरी, उत्साही    कष्ठाळू स्वभाव. पण नेहेमी अयशस्वी होणारा. उत्तम वेटलिफ्टर आहे. कला पथकात,    

        नाटकात काम करण्याचेही याला वेड आहे.

*घायाला धार्मिक आध्यात्मिक ज्ञान भरपूर, व्यवहारी वृत्ती आहे. चांगला संघटक, छक्केपंजे करण्यातही हुशार.

*मि--घाबरट स्वभाव, पापभिरू स्वभावाची व्यक्ती.

*सू--चांगला मित्र. समाजात जास्त मिसळून कार्यरत राहणारा, मदतशील धाडशी वृत्तीचा मित्र. स्वतःची फिकीर   

        करणारा, स्वबळावर कष्ट करीत पुढे जाणारा.

*बाजेष्ठ मित्र. यांचे धार्मिक ज्ञान चांगले असून ते श्रद्धाळू आहेत. पूर्वी यांच्या अंगात देवी यायची. यांचाही     

          स्वभाव मदतशील आहे. लेखन करण्याचा चांगला अनुभव. सतत पेपरमध्ये पत्र लेख लिहून समाजातील      

          समस्या मांडतात. सदैव हसतमुख चेहरा. इतरांना मदत करण्यासाठी नेहेमी पुढे. कुठल्याही उत्सवात    

          उत्साहाने सहभाग घेण्याची वृत्ती आहे. यांना प्रसिद्धीची हौसही आहे.

*ताहिचा स्वभाव फटकळ काहीसा विक्षिप्त आहे. उत्तम चित्रकार आहे. वैयक्तिक आयुष्यात खूप वाईट अनुभव

          हिने घेतलेले आहेत. अंतर्मन, योग आणि कुंडलिनी शास्त्र,  यांत हिला जास्त स्वारस्य आहे.

*मंहा शांत स्वभावाचा मित्र, कुठे जास्त खोलात शिरणारा, कलावंत मित्र. याचे अक्षर खूप छान आहे.

*--गुरुसमान मित्र. गिर्यारोहण क्षेत्रात ही सेलिब्रिटी व्यक्ती आहे. उत्तम संघटक, चांगल्या तसेच उपद्रवी माणसांची

        उत्तम पारख असलेला.

*रांमदतशील स्वभाव असणारा हा मित्र कुटील राजकारणी महत्वाकांक्षी आहे. खूप मेहेनती, स्वतःचे गिर्यारोहण    

         पर्यटन करण्यास याचे प्राधान्य असते. हा उत्तम संघटकही आहे. संस्थेसाठी काहीही करायची याची तयारी     

         असते, तिच्यावर असणारी आपली पकड मात्र हा ढिली पडू देत नाही. याच्या ओळखी भरपुर आहेत. या मित्राने   

         आपल्याला आर्थिक अडचणीत वेळोवेळी मदत केलीय,

*ना (स्वर्गस्थ)—विलक्षण तापट हट्टी स्वभाव. रागात कोणाचीही भीडभाड ठेवणारा, स्पष्टवक्ता. पण जो   

                            भावेल, त्याला मायेने स्वीकारून जिव्हाळा लावणारा. मदतशील वृत्तीचा.यानेही कठीण काळात     

                            आपल्याला आसरा दिलाय.

*(स्वर्गस्थ)--स्वतःविषयी अधिक बोलणारा, पण धाडसी वृत्तीचा मित्र. आम्ही एकत्र अनेकदा  भटकंती केलीय. भट     

                         ब्राम्हणांवर याचा विनाकारण आकस होता, त्यावरून आमच्यात वादही घडलेत. पण हा समाजसेवीही    

                         होता. आपले मत ठामपणे मांडणारा हा मित्र कोविडच्या महामारीत गेला.

*त्रेहे वयाने जेष्ठ असले तरी उत्साही स्वभाव आहे, फटकळदेखील आहेत. आम्ही एकत्र फिरलोय.

*रे--चांगला स्वभाव समाज संस्थांशी संबंधित असा हा मित्र आहे. याला प्रसिद्धीची हौस असून तो महत्वाकांक्षी    

       आहे.

*मुपूर्वी भटकंतीमध्ये याच्याशी मैत्री झाली. राज्याच्या बाहेरील हा मित्र. अजूनही आम्ही संपर्कात आहोत. याचा   

           मुलगा नौदलात मोठ्या पदावर कार्यरत आहे.

                   ही आहे माझी मित्र पंचविशी.

                   खरंतर, या व्यवहारी जगात प्रत्येकजण कामानिमित्ताने एकमेकांशी परिचित होतो. या संपर्क काळात जर स्वभाव-सूर जुळले तरच दोघांत मैत्रीचा आरंभ होतो. मात्र संपर्क वाढल्यावर आपल्याला डावे उजवेही दिसू लागते. तरी मैत्री सुरूच असते. कारण रक्ताच्या नात्याएवढेच हे नाते महत्वाचे असते. आपलं मन मोकळं करायला हक्काचं माणूस लागतं. ते काम निर्मळ मनाची मैत्री करते.

                 मी भाग्यवान आहे. कारण मित्रांगणातील या स्नेह्यांनी मला सुखदुःखात साथ दिलीय. माझे प्रश्न सोडविले आहेत, पुढे जाण्यासाठी उभारी दिलीय.

                 मोठे ऋण आहे हे त्यांचे. हे ऋण या जन्मी तरी  फिटणार नाही.

                               || ओम् मित्राय नमः ||

 

 

                                             :::::::::::::::::::::::::::::::::::

 

No comments:

Post a Comment