Tuesday, 1 November 2022

💐💐वाचन छंद💐💐

                    विख्यात मराठी साहित्यिक, अष्टपैलू लेखक, कलावंत, गायक, विनोदवीर आणि सामाजिक भान असणारा भला माणूस, अशी विविध वैशिष्ट्ये लाभलेले पु. . देशपांडे यांचा जन्मदिन आहे नोव्हेंबर(१९१९). आज शंभर वर्षे उलटून गेली, तरी पुलंचे साहित्यविश्वातले चाहते अजून वाढत आहेत.

                    या लक्षवेधी व्यक्तिमत्वाचे आज पुण्यस्मरण करताना मला लोकसत्ताया मराठी वृत्तपत्र समूहाने त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रसिद्ध केलेल्या आणखी पु. .’ या विशेषांकाविषयी थोडे सांगायचे आहे……….

💐लोकसत्ताचा आणखी पु.. विशेषांक 💐

              २०१९ हे साल पु.. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष. हा योग साधून पुलंच्या निकट सहवासातील व्यक्ती  साहित्य-कलाक्षेत्रातील मान्यवरांचे पु.लं. समवेत झालेले मनमोकळे पत्ररुपी हितगुज काही अप्रकाशित नोंदींसह लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. हा अंक एका मित्राकडून मला मिळाला.

                    या विशेषांकात पु.लं. चे अनोखे स्वभाव वैशिष्ट्य मला वाचावयास मिळाले. दिनेश ठाकूर हे पु.लं. चे नातलग होते. त्यांच्याकडे असलेल्या लिखित नोंदी पत्रव्यवहार यात वाचावयास मिळतो. पु.लं.नी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार साहित्यिका दुर्गताई भागवत यांच्या हाती कराड येथील ५१ व्या संमेलनात सोपविताना केलेले भाषण या अंकात वाचायला मिळते. आणीबाणीच्या काळामध्ये हे संमेलन झाले होते. या भाषणात पु.लं नी मोजक्या पण मार्मिक भाषेत विचार स्वातंत्र्यावर भाष्य केले आहे.

                    नागपूरचे नाटककार नाना जोग यांचे सुनिताताई-पु.. दाम्पत्याशी किती जिव्हाळ्याचे संबंध होते त्याची आगळी माहिती अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या एका लेखात आहे.

                    पंडित भीमसेन जोशी, कविवर्य बा..बोरकर, बा.सी.मर्ढेकर, विंदा करंदीकर, गदिमा, जयवंत दळवी,   ख्यातनाम गायक वसंतराव देशपांडे, पंडित कुमार गंधर्व, नाट्य कलावंत लालजी देसाई, थोर समाजसेवक बाबा आमटे, प्राध्यापक अरुण कांबळे, यांसह इतर मान्यवरांच्या आठवणी पत्रव्यवहार वाचून पुलंविषयीची खास  वैशिष्ट्ये ज्ञात झाली. या अंकात स्वतः पुलंचा एक लेखदेखील आहे.

                    मला या अंकामधील पुलंचा एक पत्रव्यवहार खास आठवणीत राहिलाय. एका परिचित विवाहित तरुणीला पुलंनी प्रदीर्घ पत्र लिहिले होते. पती-पत्नी  कुटुंबातील वाद वेगळे होण्यापर्यंत ताणले गेलेल्या दुःखी-कष्टी तरूणीला अतिशय संयमी पण ठाम भाषेत समजावीत तिला एकत्र राहण्याचे आर्जव पुलंनी केलेय. कुणाही संवेदनशील माणसाला ते पत्र गंभीर करेल. दुभंगल्या जाणाऱ्या कुठल्याही कुटूंबातील व्यक्तीला हे पत्र वाचून निश्चित मार्ग सापडेल.

                   पुलंचे साहित्य कॉलेजमध्ये असताना खूपदा वाचवायला मिळाले, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, बटाट्याची चाळ, ही पुस्तके, तसेच विविध दिवाळी अंकातील पुलंनी लिहिलेले त्यांच्याविषयी लिहिलेले लेख मी वाचले आहेत. पूर्वी कालनिर्णय दिनदर्शिकेत पुलंचे लिखाणही वाचलेले आहे. त्यांची गाजलेली नाटकेदेखील मला पाह्यला मिळाली. ही नाटके विनोदी असूनही प्रेक्षकाला गंभीर करायची. पुलंनी काही मराठी चित्रपटात काम केले आहे. काहींना संगीत दिले आहे. त्यांनी व्यासपीठावर स्वतःच्या साहित्याचे उत्कृष्ट सादरीकरणसुद्दा केलेय.

 

                  अशा गुणी व्यक्तिमत्वाचा आणखी परिचय होण्यासाठी  पुलंप्रेमींनी हा विशेषांक जरूर वाचायला हवा……..

 

                                                       :::::::::::::::::::::::

 

No comments:

Post a Comment