Tuesday, 6 September 2022

💐💐आरोग्यम धन संपदा💐💐

                आपले शरीर सर्वांगी सुंदर निरोगी राहावे असे प्रत्येकास वाटते. पण या शरीरात बिघाड झाल्यावर, आणि त्यातही आपल्या जीवावर बेतल्यावर देवाचा धावा आपण करु  लागतो.

                    प्रत्यक्षात आपण डॉक्टरला शरण जातो. ती तज्ञ मंडळी आपल्या शरीर-विकाराचा अभ्यास चिकीत्सा करून तातडीने आपल्यावर उपचार सुरू  करतात. काही दिवसात आपल्याला बरेही करतात. आपण पूर्ववत होतो.

                   आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची सखोल माहिती घेतलेली ही तज्ञ मंडळी वैद्यकीय महाविद्यालयात पाच सात वर्षात अथक परिश्रम घेऊन डॉक्टर झालेली असतात आणि प्रत्येक व्यक्तीला प्रकृतीच्या उपचारासाठी डॉक्टर-हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो.

           काही प्रसंगी मलाही हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले आहेत. असेच एकदा उपचार घेत असताना मला हॉस्पिटलमधील छोटे म्युझियम बघायला मिळाले. आपल्या शरीरातील अवयवांचे हे म्युझियम मला महत्वाचे वाटले. त्यावेळी मला मिळालेली माहिती मी थोडक्यात देत आहे...........

💐शरीर संग्रहालय💐

                मुंबईत एका सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये हे म्युझियम आहे. ते पाहण्यापूर्वी तेथल्या अटेंडन्टची परवानगी घ्यावी लागते. या ठिकाणी मानवी शरीराच्या पायापासून मेंदूपर्यंत, आतड्यापासून किडनीस्टोनपर्यंतचे अवयव विशिष्ट केमिकल्स वापरून जतन केलेले पाहायला मिळतात.

                    लहान मुलाचा जन्म कसा होतो ते अंगठ्याएव्हढ्या अर्भकापासून पूर्ण वाढ झालेल्या पोटातील बाळापर्यंतचे मांसल गोळे येथे बघितल्यावर आपण चक्रावतो !

                    हे म्युझियम प्रत्येक ज्ञानप्रेमी व्यक्तीने पहावे. शालेय विध्यार्थ्यांना तर हे आवर्जून दाखवायला हवेय. आपल्या शरीररचनेविषयी कुतूहल जागृत करणारे हे संग्रहालय कुठल्याही मान्यवर हॉस्पिटलमध्ये असू शकते. तेथे आपण अवश्य भेट द्या…….

                                                                      ::::::::::::::::::::::::::::

 

 

 

No comments:

Post a Comment