💐मित्रांगण💐

💐मित्रांगण💐 कॉलेजला असताना एक विषय होता मानस शास्त्राचा. आमच्या प्राध्यापक सरांनी सांगितलेले त्यावेळचे एक वाक्य माझ्या चांगले लक्षात राहिलेय. ‘ Man is a social animal ‘. म्हणजे मानवप्राणी हा संवेदनशील असून तो समाजप्रिय आहे. हाच विचार घेऊन मी माझ्या परिवारा बाहेर, समाजात मिसळत राहिलो. वावरत राहिलोय. त्यामुळे काही नवीन परिचय झालेत. त्यातले काही परिचय मैत्रीत रूपांतरित झाले. काहींशी दाट मैत्री झाली, तर काही वरवरचे मित्रही झाले ! माझे मित्रांगण तयार झालेय ते असे ! या मित्रांगणात हळूहळू भर पडू लागली. मित्रांच्या गप्पाटप्पात आणि फिरण्या-वावरण्यात मोठी धमाल होऊ लागली. खरे तर, पूर्वी शालेय जीवनात मित्र परिवार होता. पण मैत्री हा विषय तेव्हा नीट उमजला नव्हता. एवढे परिपकव मन नव्हते. आता तरी आपण कुठे परिपकव झालेलो आहोत एव्हढे ? मात्र सर्वसाधारण निरीक्षणातून सांग...