💐समाज संवेदना💐

💐समाज संवेदना💐 प्रत्येक माणसाला व प्राणीमात्राला जगायला काय लागते ? तर, पाणी. हे पाणी आपले जीवन आहे, असे लहानपणापासून मी ऐकत आलोय. मात्र हेच पाणी सर्वदूर नेण्यासाठी मूळ नदीकाठच्या व खोऱ्यात विस्थापित होत असलेल्या स्थानिक निवासी-आदिवासी बांधवांच्या कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसनाचे काय ? या प्रश्नाकडे माझे लक्ष वेधले गेले ते एका माहितीपटामुळे. शिल्पा बल्लाळ या तरुणीने प्रत्यक्ष पाहिलेलं व अनुभवलेलं संकटग्रस्तांचे वास्तव चित्रण आणि पुढच्या पिढीसाठी सुरु असलेल्या शैक्षणिक सत्कार्याची ओळख या माहितीपटात आहे. शिल्पा ही सामाजिक विषयांची चांगली जाण असणारी व कृतिशील कार्यकर्ती आहे. नर्मदा सरोवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांचा निकराचा लढा या महिला दिग्दर्शिकेने यात दाखविला असून तो पाहणाऱ्याला अस्वस्थ व अंतर्मुख करतो. समाजमनात घर करून राहाण्याची व प्रसंगी समाजाला वास...