💐आठवणीतली व्याख्याने💐
💐आठवणीतली व्याख्याने💐 गेल्याच महिन्यात( मे )थोर साहित्यिक आणि वक्ते, चित्रपटकथा लेखक आणि नाटककार स्वर्गीय विजय तेंडुलकर यांचा जन्मदिन होता. वृत्तपत्र आणि दूरदर्शन वाहिन्यांवर त्यांच्याविषयी मान्यवरांकडुन खूप वाचायला अन पाहायला मिळाले. असे हे दिग्गज साहित्यिक-व्याख्याते विजय तेंडलुकर यांनी एका व्याख्यामालेत मांडलेले वास्तव विचार मी येथे शब्दबद्द केलेले आहेत. 💐ऑपरेशन शेपूट......... विजय तेंडुलकर म्हटले की आठवते, हे तर मोठे लेखक-नाटककार आहेत. कितीतरी गाजलेल्या चित्रपटांच्या कथांची निर्मिती त्यांनी केलीय. बेधडक पण वास्तव जगाचे निरीक्षण ते आपल्या साहित्यातून नोंदवितात. आणि असे हे विजय तेंडुलकर ' हिंसाचार ' या विषयावर आपल्याला काय बरे व्याख्यान देणार ? शिवाय व्याख्यानाचे शिर्षक-' हिंसाचार,ऑपरेशन शेपूट ' असे वाचलेय. डोक्यात पडलेले हे कोडे त्यांच्या व्याख्यानाला गेल्याशिवाय नाही उलगडणार, असे स्व...