🌹🌹भटकंती मनसोक्त🌹🌹

कोकणात भटकंती करताना मुंबई पासून फारसे दूर नसलेले अलीबाग आणि मुरुड, नागाव, अक्षी, रेवदंडा, चौल, किहीम, कणकेश्वर, मांडवा, सासवणे, अशा कितीतरी लक्षणीय स्थळांची पर्यटकांना भुरळ पडते. आम्हा गिरीभ्रमण करणारांना मात्र अलिबाग मधील कुलाबा, सागरगड, कोरलाई, जंजिरा, पद्मदुर्ग, खांदेरी आणि उंदेरी, या सागरी किल्ल्यांची जास्त भुरळ पडते. मला या दोन्हींची सफर करण्याची संधी एकदा लाभली होती. समुद्राने वेढलेला खांदेरी किल्ला आणि टुमदार घरांच्या सानिध्यात वसलेले चौल व रेवदंडा गाव मला बघायला मिळाले. फक्त दोन दिवसांच्या या सागर सफरीची विशेष कहाणी इथे थोडक्यात सांगत आहे……….. 🌹चौल -खांदेरीची विशेष सफर🌹 ही भटकंती करायला खरेतर आम्ही तिघेजण जाणार होतो. पण अचानक एका सवंगड्याचे येणे रद्द झाले. दुसऱ्याला काही काम निघाले. शेवटी आपण एकट्यानेच जावे असे ठरवून मी मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर निघालो. तेथे ...