🌹🌹चित्रपट गप्पा🌹🌹
.jpeg)
चित्रपट महर्षी आणि ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित राय यांच्या स्मृतीदिना निमित्ताने काही वर्षांपुर्वी प्रभात चित्र मंडळ व चव्हाण सेंटर यांनी संयुक्तपणे एक चित्रपट दाखविला होता. या कार्यक्रमात प्रख्यात चित्रपट समीक्षक चिदानंद दासगुप्ता यांनी सत्यजीत राय यांच्यावर लिहिलेल्या व सिने सोसायटी चळवळीचे प्रमुख प्रणेते सुधीर नांदगावकर यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनसुध्दा झाले. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर, दिग्दर्शक बासू भट्टाचार्य, सिने अभ्यासक प्रा. अशोक रानडे, ग्रंथालीचे दिनकर गांगल, रामदास फुटाणे, सुलभा देशपांडे, अमोल व चित्रा पालेकर, राजदत्त…..अशी रथी महारथी मंडळी यावेळी उपस्थित राहिली होती. सत्यजीत राय यांनी निर्माण केलेला शेवटचा चित्रपट ‘उत्तरोन’ या निमित्ताने मला पहायला मिळाला. हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच सत्यजित राय गेले. त्यानंतर राय यांचे सुपुत्र व बंगाली चित्रपट स...