💐💐आठवणीतील व्याख्याने💐💐

दुर्ग किल्ल्यांची भटकंती करणाऱ्या छंदीष्ट तरूणांना पर्वणी ठरावी, असे एक व्याख्यान ऐकण्याची संधी नुकतीच मला मिळाली. विलेपार्ले येथील जनसेवा समिती या जून्या जाणत्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. संदीप मुळीक या तरुण लेखकाने गोमंतक भूमीतील स्वराज्यकालीन व त्यापुर्वी घडलेल्या घटना तसेच, प्राचीन वास्तूंचा शोध घेऊन त्यांचा इतिहास ‘गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर’ या पुस्तकात शब्दबध्द केला आहे. त्या शोध-भटकंतीचा धांडोळा घेणारे हे व्याख्यान होते…………….. 💐मराठ्यांचे गोमंतकीय दिग्विजय💐 ‘मराठ्यांचे गोमंतकीय दिग्विजय’ या विषयाची व्याप्ती मोठी आहे. त्यामूळे संदीप मुळीक यांनी श्रोत्यांपूढे स्लाईड व व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण करुन माहिती देण्यास सुरुवात केली. गोवा महाराष्ट्राचे शेजारी व दक्षिण कोकणाला लागून असलेले स्वतंत्र राज्य आहे. गोव्यात समुद्रकिनारे, चर्चेस पहायला पर्यटक गर्दी करतात. मनसोक्त दारू ढोसाय...