💐💐निसर्गायण💐💐

निसर्ग अन् आपलं आयुष्य यांचं एकमेकाशी नातं असतं. हे नातं जेवढं गहिरं होत जातं, तेवढी जगण्याची गोडी वाढत राहते. याची चांगली अनुभूती मला वेळोवेळी मिळालीय. फिरण्या भटकण्याच्या नादापायी निसर्गाचे सानिध्य मला मिळते आहे. निसर्गाची वेगवेगळी रूपं आणि गुणवैशिष्ट्ये न्याहाळताना माझे मन नेहेमी प्रफुल्लित होत असते. सकाळ उजाडते, तेव्हा सवयीने मला जाग येते. मग भरभर सारे आवरून माझी पावले घराबाहेर पडतात. सकाळच्या शांत समयी निर्मनुष्य रत्यावरून सफर करीत, दूरवरची डोंगररांग न्याहाळत मी संकुलातील उद्यानात प्रवेश करतो……….. 💐मॉर्निंग वॉक💐 आपण रोज सकाळी उठतो. अगदी फ्रेश वाटण्याची ही वेळ, कारण रात्रीच्या विश्रांतीनंतर बहुतेकजण अगदी ताजेतवाने होतात. मात्र याला काही अपवाद आहेत. काहींना सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ! काहीजण रात्री उशिरापर्यंत मोबाईलशी खेळत जागरण करतात, काहींना नोकरी धंद्यासाठी सकाळीच पळापळ करावी लागते ! मात्र मनात आणले तर या सगळ्यातून आपण थोडा वेळ ...