Posts

Showing posts from February, 2020

💐मनभावन कविता💐

Image
💐मनभावन कविता💐         स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील बहुजनांचे प्रेरणास्थान मानले जाते. राज्यातच नव्हे तर  देशभरात आणि परदेशातही  शिवप्रेमी विखुरलेले आहेत, त्यामुळे  दरवर्षी   शिवजयंती सर्वत्र मोठया उत्साहात साजरी होते. या महिन्यात १९ तारखेला (इंग्रजी महिन्याप्रमाणे) शिवजयंती सोहोळा संपन्न  होईल.                  विख्यात बंगाली साहित्यिक रवींद्रनाथ  टागोर(ठाकूर)  यांनी छत्रपती शिवरायांवर एक सुंदर कविता रचली आहे. महाराजांना त्रिवार वंदन करून मी ही  श्रवणीय कविता सादर करीत आहे :-                      💐शिवाजी राजा…………. त्या अनोळखी प्रदेशात  केव्हातरी            घनदाट अरण्यानं  वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना मानवेन्द्रा, शिवाजी राजा,            तुझ्या मनात विचार चमकला असेल : शतखंड झालेल्या भारताच्या या तुकड्या...

💐वाचन छंद💐

Image
💐वाचनछंद💐                     स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचेविषयी थोर साहित्यिक आणि नाटककार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना अतीव आदर होता. सावरकरांची देशाविषयीची तळमळ व त्यापायी केलेला त्याग, सोसलेला तुरुंगवास यातून आचार्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी सावरकरांचे बहुतेक साहित्य वाचून काढले.                               अभ्यासू साहित्यिक-नाटककार-कवी, थोर स्वातंत्र्य सेनानी, दृष्टे समाजसुधारक  आणि भाषाप्रेमी, अशी वैशिष्ट्ये लाभलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषेचे शुद्धीकरण किती महत्वाचे आहे, हे समाजास पटवून दिले. शुद्ध देवनागरी-मराठी लिपी व भाषेच्या प्रचारार्थ त्यांनी केलेले आंदोलन व प्रयत्नांची माहिती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी संपादन केलेल्या व परचुरे प्रकाशनाने प्रसिद्द केलेल्या  पुस्तकामधील एका प्रकरणात वाचावयास मिळाली.  ‘क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर’ असे या संपादित पुस्तकाचे नाव आहे.         ...

💐थिएटरमध्ये💐

Image
💐थिएटरमध्ये(रंगभूमी)💐                  आमच्या मुंबईतील दादरचे शिवाजी मंदिर, गिरगावचे भालेराव नाट्यगृह,  व्हीटीचे(आता सीएसएमटी) रंगभवन, आणि परळ-प्रभादेवीच्या दामोदर हॉल-रविंद्र नाट्य मंदिरामधून खूप चांगली नाटकं व्हायची. ती जमेल तेव्हा  पाहिली आहेत. थोर मोठे कलावंत जवळून बघितलेत, त्यांचे अभिनय पाहिलेत.                     या सगळ्यात, लक्षात राहिलेली नाटकं आहेत-‘ वाहातो ही दुर्वांची जुडी, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, संशय कल्लोळ, गेला माधव कुणीकडे, रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, तरुण तुर्क म्हातारे अर्क, पुरूष, हिमालयाची सावली, काचेचा चंद्र, एखादी तरी स्मीत रेषा, फुलाला सुगंध मातीचा, उघडले स्वर्गाचे दार, बबनप्रभूंची दोन प्रसिद्ध नाटके,……. ही यादी वाढणारी आहे.                          गिरगाव येथे मुंबई मराठी साहित्य संघाचे एक छानसे नाट्यगृह आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी हे थिएटर नाट्यरसिकांनी गजबज...