💐भटकंती मनसोक्त💐

💐 भटकंती मनसोक्त 💐 आषाढ वारी सुरू झालीय . यंदा आषाढी एकादशी आहे बारा जुलैला . या वारीत राज्यभरातून-राज्याबाहेरुनच नव्हे , तर दूरदेशातील विविध जातीधर्माचे लहानथोर , सश्रद्द आणि निरक्षर , तसेच उच्चशिक्षित वारकरी सहभागी होऊन निघालेत पंढरपूरच्या दिशेने . श्री विठु माऊलीच्या चरणी माथे टेकल्यावर हा अवघा संप्रदाय धन्य होईल , अन चंद्रभागेच्या तीरी सर्वत्र आनंदकल्लोळ सुरू होईल . मीही एक वारकरी आहे . पण पंढरीच्या वारी इतकेच माझे लक्ष तेरा व चौदा जुलैला होणाऱ्या गिरीमित्रांच्या संमेलन वारीकडे लागलेय . दरवर्षी नित्यनेमाने दीड दिवसांच्या या वारीमध्ये सहभागी होताना मला श्रीक्षेत्र पंढरीत असल्यागत वाटणार आहे . मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये मुलुंडला साजऱ्या होणाऱ्या ‘गिरीमित्र संमेलनात ’ कित्येक नवेजुने गिरीमित्र - मैत्रिणी उत्साहाने भेटतील आणि ...