💐 लक्षवेधी💐

💐 लक्षवेधी💐 दूरवर हिमालयात,अवघड रस्ते आणि घाटीमध्ये आपली जुन्या जमान्यातली स्कुटर घेऊन भटकणारा एक कलंदर स्कुल टीचर आपल्या भारतात आहे. मुंबईत, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हसतमुख टीचर आपल्या या आगळ्या हौसेविषयी संवाद साधण्यासाठी आला अन त्याने मला प्रभावीत केले. या लक्षवेधीचा मजेदार परिचय...... 💐स्कुटर स्वार मास्तरजी.. राजधानी दिल्लीमध्ये एक प्राथमिक शाळा आहे. तेथे हा मनस्वी स्कुल टीचर मुलांना शिकवितो. या टीचरने आपल्या स्कुटरवरून कितीतरी अवघड आणि उत्तुंग हिमालयीन रस्त्यांची आनंदी सफर केलीय. याचे नाव आहे तरुणकुमार गौतम. वयाने तरुण आणि हसतमुख चेहेऱ्याची ही वल्ली आपले सफर विक्रम एका कार्यक्रमात सादर करीत होती. ' मास्तरजी ' या टोपण नावाने हा प्रसिद्द आहे शाळेत. वर्षभर हा फिरत असतो !...