💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐 दररोज प्रवास करताना अन स्वैरपणे भटकताना नित्यनवे अनुभव मिळतात. त्यासाठी आपण ' जागे ' असणे मात्र महत्वाचे आहे....... 💐कान प्रामाणिक असतात......... चर्चगेटकडे निघालेली गोरेगांव लोकल कशीबशी पकडली. रोजच्याप्रमाणे आडोसा पाहून उभा राह्यलो. प्रथम जोगेश्वरी, मग अंधेरी, त्यानंतर थेट वांद्रे स्टेशन येते. मग उतरायचे. संपला आपला सकाळचा रेल्वे प्रवास ! धक्काबुक्कीची आता सवय झालीय. पिट्टू सॅकवाले हैराण करतात या गर्दीत. सॅक सरळ हातात घेऊन ती खाली धरण्याऐवजी हे अक्कलवंत पुढे स्वतःच्या पोटावर लावतात ! त्यामुळे जागा व्यापते. पुढच्यालाही ती लागते, टोचते. मीही सॅक वापरतो. पण नेहेमी गर्दीत ती हाती घेऊन खाली धरून प्रवास करतो. आजही तेच ! गर्दी होतीच. या गर्दीत टपोरे खूप असतात. वांद्रे स्टेशनला या गर्दीतून उतरायला सोयीचे व्हावे म्हणून एका बाजूस मी उभा होतो. तेथे एकजण दरवाजाला दांडी पकडून उभा राह्यले...