💐लक्ष वेधी💐
💐लक्ष वेधी💐 आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपला रोजचा आहार कसा असावा, आणि रोग-व्याधी, आजारापासून आपण कोणती खबरदारी कशी घ्यावी, याचे साध्या सोप्या शब्दांत ' लोकसत्ता' मध्ये विवेचनात्मक लेखन करणारे व महाराष्ट्रात सुपरिचित असलेले वैद्य खडीवाले, यांचा मीसुद्धा एक वाचक होतो. आज हे वैदय खडीवाले हयात नाहीत. गेल्या डिसेंबर महिन्यात पुणे येथील कर्मभूमीत त्यांचे दुःखद निधन झाले. ' दैनिक लोकसत्ता ' या जाणत्या वृत्तपत्रात त्यांचे प्रसिद्द झालेले लेख माझ्यासारख्या कित्येकांना उपयोगी ठरलेत. त्यांनी लिहिलेली आहार, आरोग्य व आयुर्वेदिक औषधाविषयीची पुस्तके माहिती पूर्ण तसेच उपयुक्त आहेत. या थोर व्यक्तीचे स्मरण म्हणून हा लेख येथे लिहिला आहे.......... 💐कडक शिस्तीचे डॉक्टर वैदय खडीवाले.................