🌹तारीख पे तारीख.....🌹
💐कथाघर............💐 या कथाघरात प्रवेश करताना प्र. के.अत्रे या प्रसिद्द लेखक,पत्रकार,नाटककारांचे स्मरण होतेय. अत्रे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत.कॉलेजात असताना त्यांच्या क-हेेचं पाणी या गाजलेल्या आत्मचरित्राने भारून टाकले होते. आयुष्यातल्यातल्या उलाढालीवर त्यांचेच 'मी कसा झालो', हे सुद्दा एक वेधक पुस्तक आहे.त्यांची कितीतरी नाटकं अजूनही रंगभूमी गाजवताहेत. कथासंग्रह देखील वाचकप्रिय आहेत.सानेगुरुजींच्या आयुष्यावर चित्रित झालेला ' श्यामची आई 'हा चित्रपट तर राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरला. त्यांची ' चांगुणा 'कादंबरी प्रसिद्द आहे.ती सत्यावर आधारित आहे.प्रतिकुल परिस्थितीशी सामना देणाऱ्या यशोदेची कथा वाचकाला अंतर्मुख करते. त्या पुस्तकाच्या प्रारंभी अत्रे म्हणतात '.....आजकालचे आम्ही लेखक स्वतःला वास्तववादी म्हणवतो खरे,पण जीवनातली खरीखुरी वास्तवता च...