💐💐लक्षवेधी💐💐

साध्या शेतकऱ्याचा वेश, अंगकाठी साधारण, करारी बाणा अन् भेदक नजर अशी आगळी वेगळी व्यक्ती म्हणजे संभाजी भिडे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर अपार श्रध्दा असलेले भिडे गुरुजी आज पंचाहत्तरीच्या पुढे आहेत. शरीरात आणि मनात तरूणांना लाजविणारा उत्साह असणाऱ्या या लक्षवेधी व्यक्तिमत्वाची ही ओळख माझ्या निरिक्षणातून……….. 💐शिवभक्त भिडे गुरुजी💐 भिडे गुरुजी एकदा विलेपार्ले येथे आले होते. उत्तुंग परिवार या संस्थेने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. तत्पूर्वी एकदा मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वार्षिक गिरीमित्र संमेलनात भिडे गुरुजी अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. असे दोनदा गुरुजींचे दर्शन झाले होते. या दोन भेटींतून त्यांचे जे स्वभावपैलू मला दिसले, ते माझ्या कायम स्मरणात राहिलेत. गावंढळ दिसणारे मराठमोळे सांगलीकर गुरुजी ब्रह्मचारी आहेत. त्यांची उंची जेमतेम पाच फूट असून ...