Posts

Showing posts from November, 2023

💐💐अद्भुत💐💐

Image
             अवती भवती फिरताना , वावरताना सर्वसाधारणपणे आपल्याला नेहेमीचा परिसर दिसतो , नेहेमीचे दृश्य दिसते . नेहेमीच्या व्यक्ती दिसतात , त्या भेटतातही . मात्र आपण अधिक फिरलो , वावरलो तर नवनवीन परिसर ,   व्यक्ती   ज्ञात होतात .                 कधी कधी मात्र   भोवतालच्या अद्भुत घटना आपल्या कानी पडतात ………….…. 💐 साखरेचा गोडवा 💐            ही अद्भूत कहाणी   डॉ . प . वि . वर्तक या   चिकित्सक व व्यासंगी व्यक्तीकडून जाहीर कार्यक्रमामध्ये मला ऐकायला मिळाली .               बारामतीकडील गायकवाड नावाचा तरूण एकदा पुण्यातील तरुण भारत या वृत्तपत्राच्या संपादकीय कार्यालयात जाऊन म्हणाला , ‘ साहेब , मला एक दावा प्रसिध्द करायचाय . मी जेथे जेथे जातो , ज्याला ज्याला हात लावतो ती वस्तू गोड होते !’    ...