Posts

Showing posts from September, 2023

💐💐थिएटरमध्ये💐💐

Image
              मराठी नाटक थिएटरमध्ये पाहण्यात प्रत्येक रसिकाला विशेष आनंद मिळतो . आपली नाट्यकला प्रत्यक्ष रसिकांसमोर सादर करणाऱ्या कलावंतांचा अभिनय , त्यांची देहबोली , संवादाची फेक , हे सारे प्रेक्षकाला नाटकाच्या कथानकात समरस करतात . तो त्या सादरीकरणाला मनःपूर्वक दादही देत असतो . कलावंतांना देखील त्यात आगळे समाधान व प्रेरणा मिळते .                 एक नाट्यरसिक म्हणून ही अनुभूती घेण्याचा प्रयत्न करताना मला कितीतरी चांगली मराठी नाटके बघायला मिळाली . त्यापैकी ‘ गेला माधव कुणीकडे ’ आणि ‘ सुंदर मी होणार ’ ही दोन नाटके आहेत .               चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यगृह   उद्घाटन सोहोळ्याच्या निमीत्ताने ही नाटके सादर झाली होती . वसंत सबनीस या सदाबहार नाटककाराचे   एक नाटक होते , तर दुसरे विख्यात अष्टपैलू साहित्यिक पु . ल . ...