💐💐हिमयात्रा💐💐

जगात सर्वोच्च स्थानी असणारे ' एव्हरेस्ट ' हिमशिखर ( उंची २९ , ०२८ फूट ) आयुष्यात एकदा तरी सर करावे , असे प्रत्येक साहसी गिर्यारोहकाचे स्वप्न असते . विविध मोहिमांद्वारे जगभरातील गिर्यारोहक हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात . काहींना त्यात यश मिळते , काहींना अपयश . कित्येकांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात या उत्तुंग एव्हरेस्टसाठी ! स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा एव्हरेस्ट प्रवास अखंडितपणे सुरू आहे अन् यापुढेही सुरू राहील . महाराष्ट्रातील साहसी गिर्यारोहकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प पंचवीस वर्षांपूर्वी केला होता. तो संकल्प पूर्ण केला ...