💐💐मनभावन गीतं, गाणी अन कविता💐💐

खट्याळ शब्दात लिहिलेले एक सुंदर बालगीत माझ्या संग्रहात आहे . भाऊ तोरसेकर या मुंबईकर पत्रकार , साहित्यिकाने हे बडबड गीत लिहिले य . १९८० - ९५ च्या काळात त्यांनी भरपूर लिखाण केले . मार्मिक साप्ताहिकाच्या संपादन विभागात ते जबाबदार पदावर कार्यरत होते . त्यांची काही प्रवासगीतं आजही कित्येक ट्रीपमध्ये गायली जातात . हे बडबडगीत वाचताना आपणही लहान होऊन शाळेत जाऊया …………….. 💐 दप्तरात भांडण 💐 वसुदच्या पेनला झालं पडसं , दिसेना काही नाकापुढचं निबातून शाई होती गळत , फाऊंटन पेनला नाही कळत . कोऱ्या कागदावरती डाग , सुंदर वहीला आला राग पुस्तक म्हणालं हसत हसत , आता बसा शाई पुसत . पेन्सिल टोचून म्हणते कशी , शाई अशी जाईल कशी ? खोडरब्बर मध्येच घुसला , शाईसंगे भांडत बसला . पेन बिचारं घाबरलं , त्याने टोपण पांघरलं कंपास प...