💐💐स्वर्गस्थ💐💐

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एक दुःखद बातमी ऐकायला मिळाली . सिनेपत्रकार , चित्रपट सोसायटीच्या चळवळीत अग्रस्थानी असणारे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक - अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले . प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील सर्वात जुन्या सिने सोसायटीची स्थापना करण्यात नांदगावकर यांचा पुढाकार होता . आपण प्रभात संस्थेशी चित्रपट पाहण्याच्या छंदापायी जोडले गेलो व आपल्या प्रेक्षक नजरेत आमूलाग्र बदल झाला . कितीतरी देशी विदेशी चित्रपट प्रभातमुळेच बघायला मिळाले आणि नांदगावकरांमुळे आपली प्रभातशी ओढ टिकून राहिली . जुन्या जाणत्या संस्थेतील या निष्ठावंत व्यक्तीला माझी आदरांजली म्हणून हा शब्दसंवाद करीत आहे …..…….. 💐 चित्रपट रसिक चळवळीचे निष्ठावंत कलाकर्मी : सुधीर नांदग...