💐💐मनातलं जनांत💐💐

मुंबईतील पश्चिम उपनगरात गोरेगावमध्ये बऱ्याच समाजसेवी संस्था कार्यरत आहेत . या परिसरात कितीतरी सन्मान्य व्यक्तीदेखील राहतात . राजहंस प्रतिष्ठान ही जुनी जाणती सेवाभावी संस्था गोरेगाव पूर्वेला जयप्रकाश नगरमध्ये कार्य करीत आहे . गरीब , गरजू रुग्णांना सहाय्य करण्यात ती अग्रणी आहे . संस्थेचे प्रमुख सुहास कबरे हे दिवसरात्र त्यासाठी कार्यकर्त्यांसह झटत असतात . ही संस्था दरवर्षी विशेष कार्यक्रमांचे आयोजनही करते . विविध क्षेत्रातील सेवाभावी व्यक्ती - संस्थेचा सन्मान सोहोळा , सांगीतिक मैफल , काव्य संमेलन , व्याख्यानमाला , मनोरंजन तसेच प्रबोधनात्मक कार्यक्रम संस्था उत्साहात साजरे करते . या संस्थेने प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांच्या मिश्किल काव्यमैफिलीचा सुंदर कार्यक्रम हल्लीच ...