💐💐आरोग्यम धन संपदा💐💐

आपले शरीर सर्वांगी सुंदर व निरोगी राहावे असे प्रत्येकास वाटते . पण या शरीरात बिघाड झाल्यावर , आणि त्यातही आपल्या जीवावर बेतल्यावर देवाचा धावा आपण करु लागतो . प्रत्यक्षात आपण डॉक्टरला शरण जातो . ती तज्ञ मंडळी आपल्या शरीर - विकाराचा अभ्यास व चिकीत्सा करून तातडीने आपल्यावर उपचार सुरू करतात . काही दिवसात आपल्याला बरेही करतात . आपण पूर्ववत होतो . आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची सखोल माहिती घेतलेली ही तज्ञ मंडळी वैद्यकीय महाविद्यालयात पाच सात वर्षात अथक परिश्रम घेऊन डॉक्टर झालेली असतात आणि प्रत्येक व्यक्तीला प्रकृतीच्या उपचारासाठी डॉक्टर - हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागतो . ...