💐भटकंती मनसोक्त💐💐

दूरवर दक्षिणेकडे असणारे अंदमान - निकोबार बेट पाहाण्याची मनी खूप इच्छा होती . अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रदीर्घ वास्तव्य केलेय , अंदमानच्या जवळची कित्येक बेटे भारतीयांना आजही अपरिचित आहेत , प्रतिबंधित आहेत , हे सारे मी ऐकून होतो . म्हणून , एका मान्यवर संस्थेच्या माध्यमातून जेव्हा मोठ्या टीमला तेथे नेऊन आणण्याची जबाबदारी स्वीकारण्याबाबत मला विचारणा झाली , तत्क्षणी त्यांना होकार दिला आणि तिकडे जाण्याची तयारी सुरू केली . अंदमानची सागर भटकंती मी मनसोक्तपणे केलीय , पण ही खट्टीमिठी सफर आहे . यात पर्यटनस्थळे पाहण्यापेक्षा सहभागी ग्रुपला सांभाळण्याची मोठी जबाबदारी ज्या दोघांवर होती , त्यातील मी एक होतो . या भटकंतीमध्ये आम्हाला सह...