💐💐निसर्गायण💐💐

जून महिना उजाडला , तरी वातावरणातील उष्णतेच्या झळा काही कमी झालेल्या नाहीत . हा उन्हाळा साऱ्यांना बेजार करीत आहे . अवघ्या जीवसृष्टीलाच तीव्र उन्हाळ्याची झळ बसते आहे . मात्र उष्णतेचा हा कोप नैसर्गिक नाही , हा मानव निर्मित आहे . बेसुमार जंगलतोड आणि निसर्ग संवर्धनाकडे होत असलेले दुर्लक्ष , यांमुळे हे घडत आहे . वास्तविक , वातावरणाचे आरोग्य निरोगी राहाण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हायला हवीय . डोंगर , दऱ्या , नदी , नाले , यांचे अस्तित्व कायम राहण्यासाठीही हे जरुरीचे आहे . पाऊस , पीक आणि पाणी हे निसर्गाचे अनमोल देणे अखंडीत ठेवण्याची जबाबदारी पृथ्वीवर राहाणाऱ्या , वावरणाऱ्या प्रत्येकाची आहे . निसर्गाचे संवर्धन आपण कर्तव्यबुद्दीने व...