💐मनातलं जनात💐

💐 मनातलं जनात 💐 माझ्या आयुष्यातल्या आषाढ वाऱ्या दोन आहेत . एक पंढरीच्या श्रीविठुरायाची वारी , तर दुसरी आहे गिरीमित्र संमेलनाची वारी ! यापैकी पंढरीची वारी इच्छा असूनही मी अजून केलेली नाही . त्यामुळे ती अनुभवलेलीसुद्दा नाही . आपल्या महाराष्ट्रात डोंगरवेड्या गिरीमित्रांची संमेलनवारी दरवर्षी याच काळात भरते . मुलुंड या मुंबईतील उपनगरामध्ये अवघे गिर्यारोहक आणि गिरिप्रेमी उत्साहाने जमतात . हाऊसफुल्ल वातावरणात ही वारी रंगते . यंदा मात्र ही संमेलन वारी होण्याची शक्यता नाही ! या दोन वारींविना तळमळणारे माझे अंतर्मन जनांस काही आठवणी सांगू इच्छितेय ………………… 💐 लॉकडाऊन आषाढ वारी ...