💐चला कोकणात💐

💐चला कोकणात💐 कोकणात फिरताना व वावरताना बऱ्याच ठिकाणी नवीन माहिती मिळते. ऐतिहासिक वास्तू, व्यक्ती किंवा कलाप्रकाराचे वैशिष्ट्यदेखील ज्ञात होते. कोकणाविषयी मला जे ज्ञात आहे, ते तुम्हास माहित व्हावे, म्हणून ही कोकण कोडे मालिका रुपात गेल्या वर्षी सुरू केलीय. आता ही २०२० ची ज्ञान सफर….…………. 💐कोकण कोडे-१/२०२० १.उत्तम तांदुळ पिकाचे वाण व त्यावर अविरतपणे संशोधन करणारी राज्यातील अग्रगण्य तसेच देशात प्रसिद्द असलेली संस्था रायगड जिल्ह्यात कुठे आहे ? २.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारी व नवनवीन शोध-संकल्पना यांमधून त्यांना प्रेरणा देत परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य जपणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘वसुंधरा विज्ञान केंद्र’ ही संस्था कुठे आहे ? ३.हा कोकणातील सर्वात मोठा जल विद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे ? ४.सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय असलेला हा पारंपारिक नाट्यकला प्रकार आहे. ५.पालघर जिल्ह्यामधील चिकू या गोड फळासाठी भारतात प्रसि...