💐मनातलं जनात💐

💐मनातलं जनात💐 महाराष्ट्रातील प्रसिध्द असलेली मॅजेस्टिक प्रकाशन संस्था, मुंबई यांनी विविध विषयांवरची हस्तलिखिते प्रकाशनपूर्व तपासणीसाठी मागविण्याची एक योजना जाहीर केली होती. हस्तलिखित साहित्य प्रकाशनयोग्य आहे अथवा नाही प याची तपासणी अभ्यासू व चिकित्सक, जाणकारांमार्फत होणार होती. आपण पुस्तक लिहिण्याएवढे कोणी लेखक-साहित्यिक नाही. आपण छंद म्हणून लिहितो. त्यामुळे मनात असलेले दैनंदिनीत येते. व्यक्तही होता येते. दैनंदिनीचे अशा लिहिण्याला श्रेणी कोणती असेल ? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तपासणी आवश्यक वाटली, शिवाय, या दरम्यान भटकंती आणि इतर विषयांवरील काही लेख प्रसिद्द होत होते साप्ताहिक, मासिक, आणि नियतकालिकांत. त्यामुळे तज्ञ साहित्यिकाच्या निरीक्षणानंतर आपल्याला ज्ञात होईल की आपण नेमके कुठे उभे आहोत ! हे विचार मनी धरून मी दैनंदिनीचा एक भाग प्रकाशकांकडे पाठविला. त्यात सगळे स्पष्ट केले होते. ...