💐स्वर्गस्थ💐

💐स्वर्गस्थ💐 जगभरात विनोदी अभिनय करण्यात बाप असलेला चार्ली चॅप्लिन हा माझा सर्वात आवडता नट. मला चित्रपट पाहण्याचा छंद लागला तेव्हा, चार्लीचे काही बोलपट- मुकपटही पाहायला मिळाले. त्यातील कारुण्यमय कथा डोळ्यासमोर पाहताना आपल्या निर्मळ हास्याने माझ्यासह सर्वच संवेदनशील रसिक प्रेक्षकांचे ताणतणाव हलके करणारा विनोदी नट चार्ली मला जवळचा वाटू लागला. आपल्या नेहेमीच्या जगण्या-वावरण्यात सततचे ताण आपले आयुष्य कणाकणाने कमी करीत असतात. अशा परिस्थितीत चार्ली, व चार्लीसारख्या कित्येक अभिनेत्यांनी मला खूप हलके केले आहे. चार्ली चॅप्लिन, मेहमूद, दादा कोंडके, जॉनी वॉकर, लक्ष्मीकांत बेर्डे, ही माझ्या विनोद विश्वातील ‘तारे’ मंडळी आहेत. या विनोदी ताऱ्यांबद्दल खूप सांगण्या सारखे आहे. मात्र आज येथे मी चार्ली चॅप्लिनची जीवन कहाणी व अभिनयाची कारकीर्द याविषयी थोडक्यात सांगत आहे. चिकित्सक साहित्यिक स्वर्गीय य. दि. फडके यांच्या एका पुस्तकामध्ये चार्लीचा परिचय वाचला आणि मला यावर लिहावेसे...