💐निवडणूक धमाल-२💐

💐निवडणूक धमाल-२💐 भारतीय प्रजासत्ताकातील लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरचा उत्साही माहोल आज सर्वत्र आहे. जे जिंकलेत ते आनंदात असले तरी पुढच्या चिंतेत आहेत. आणि हरलेले, ‘आता कुठेतरी आसऱ्याला जायला हवे, नाहीतर ना घरका ना घाटका, अशी स्थिती होईल, तेव्हा काय करावे ? इकडे की तिकडे ? ’ या संभ्रमात आहेत. आज, सर्वसामान्य झालेला मतदार राजा, ’ सुटलो बुवा एकदाचा या ‘ निवड’णुकीच्या जबाबदारीतून,’ असे म्हणून काहीसा निश्चिंत झालाय. ‘एक दिवस राजा अन पाच वर्ष सजा’, हे त्याचे भूत-भविष्य, आणि वर्तमान असल्याची जाणीव त्याला आहे. कुणाचीही सत्ता आली तरी त्याच्या दैनंदिन जगण्यावर विशेष फरक पडणार नाही. भीत भीत तो जगणार आहे आणि वावरणार आहे. भीतीच्या या ‘ मी ‘ ला कविवर्य स्वर्गीय मंगेश पाडगावकरांनी एका कवितेमध्ये शब्दबद्द केलेय. ही कविता आजच...