💐संस्थात्मक💐

💐संस्थात्मक💐 आयुष्यभराच्या वाटचालीत ज्या दहाबारा संस्था-संघटना आणि चळवळींशी संबंध आला, तेथे सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून सहभाग घेतला आणि काम करीत राहिलोय. आता, याचा लेखाजोखा काढण्याची इच्छा झाली, व लिहायचे ठरवले. काही ठिकाणी जबाबदारीचे पद मिळाले, तर कोठे सर्वसामान्य स्वयंसेवक-कार्यकर्ता म्हणून काम करीत राहिलोय. शैक्षणिक, सामाजिक, गिर्यारोहण, अध्यात्मिक, गृहनिर्माण, अशा विविधतेने विस्तारलेल्या क्षेत्रात वाररून तेथील वास्तव चित्र राजकारणासह आणि राजकारणाशिवाय, या दोन्ही कोनातून पाहायला मिळाले. त्याचे संपूर्ण निरीक्षण-परीक्षण करणे व त्यावर लिहिणे हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल. या ठिकाणी मी मांडलेला लेखाजोखा संक्षिप्त स्वरूपात आहे....... 💐राजकारण कुठे नाही ?........... ●शैक्षणिक-सामाजिक संघटना- ...