💐धार्मिक पण मार्मिक💐

💐धार्मिक पण मार्मिक💐 संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबा रायांच्या वास्तव्याने पावन झालेले पुण्याजवळील आळंदी, हे माझे आवडते ठिकाण. एकट्याने तेथे जाऊन निवांत राहाणे हा एक वेगळा व विलक्षण अनुभव आहे, आणि त्याचा लाभ मी अधूनमधून घेतो आहे. नुकतंच आळंदीला जाणं झालं, त्याविषयी तुमच्याशी हा मार्मिक संवाद......... 💐दशक्रिया समारंभ,श्रीक्षेत्र आळंदी......... याक्षणी इंद्रायणी नदीच्या घाटावर मी निवांत बसलोय. वेळ आहे सकाळची. इंद्रायणीचे पात्र पुरेसे भरलेले नाही. तीचा जलप्रवाह शांतपणे वाहात आहे. घाटावर चहू दिशेला पायऱ्या आहेत. उजवीकडे एक गाडीरस्ता आहे पुलाचा. डावीकडे असलेल्या एका छोट्या सिमेंट पुलावरून समोरच्या काठावर(म्हणजे घाटावर) जा ये करता येतेय. इथे कोठेही बसता येतेय. कोवळ्या उन्हाची तिरीप सर्वत्र पसरलीय. मोसम थंडीचा असल्याने कोवळी उन्हे छान अंग शेकताहेत. या नयनरम्य घाटा...