💐आठवणीतील व्याख्याने💐

💐आठवणीतील व्याख्याने💐 आपल्या चिरतरुण गीत आणि संगीताने रसिक श्रोत्यांना सदैव गुणगुणत ठेवायला लावणारे हसतमुख असे यशवंत देव आज आपल्यात नाहीत. सोमवार २९ नोव्हेंबर च्या मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पण माझ्या मनात या स्वरमयी देवांचे व्याख्यान अजूनही गुंजत आहे.......... 💐गीत,शब्द, अन सुरेल चाली......... ' असे गाणे जन्मा येते ' हे कविवर्य आणि संगीतकार यशवंत देवांचे व्याख्यान चिंचपोकळी येथील विवेकानंद व्याख्यानमालेने आयत्यावेळी घोषित केले. त्या दिवशी होणार होते साहित्यिक अरुण साधू यांचे व्याख्यान. विषय होता- 'मराठीची गळचेपी ' . अर्थात, यशवंत देवांचे व्याख्यान स्मरणीय असेच झालेय. देवांच्या चेहेऱ्यावर हास्य, पण स्वभाव मिश्किली अन खोडकर असा ! हे त्यांच्या संवादात जाणवले. आपल्या बोलण्यातून केलेल्या हलक्य...