💐थिएटरमध्ये💐

💐थिएटरमध्ये💐 माझ्या थिएटरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज शुभारंभी या ठिकाणी सादर होणार आहे एक छोटेसे नाटक. हे एक अंकाचेच असल्याने तुम्ही म्हणाल, ही तर एकांकिका आहे ! होय, ही एक एकांकिका आहे. माझे हे पहिले नाट्यलेखन मला कितपत जमलेय ते तुम्हीच ठरवा. आज समाजात विशेषतः तरूणवर्गात व ग्रामीण महिलावर्गात मावा-गुटखा- तंबाखूयुक्त पान मसाला-खैनी यांचे व्यसन खूप वाढलेय. यातील तंबाखू आणि घातक रसायने शरीरात पसरून कॅन्सर सारखा भयंकर आजार हा समाज आपल्या अंगावर घेत आहे. हे सगळे भयाण आहे. अशा समाजात काही अंशी तरी जागृती व्हावी, म्हणून मी हे एकांकिका लेखन केलेय. माझे हे पहिलेच नाट्यलेखन आहे, हे कितपत जमलेय हे तुम्ही ठरवा. ...