💐मनातलं जनांत💐
💐मनातलं जनांत💐 आठवतेय १९८२ साल ? आणि जानेवारी महिन्यातली १८ तारीख ? याच दिवशी गिरणी कामगारांच्या संपास सुरुवात झाली. अजूनही तो मिटलेला नाही !(कायद्याच्या नजरेतून). आज या घटनेला ३६ वर्षे होऊन गेलीत. हजारो गरीब,गरजू कामगारांची पार वाताहात करून टाकली या संपाने. मात्र या संपात तग धरणारे कामगार आणि त्यांचे परिवार अजुनही वाटचाल करीत जीवनाची रहाटगाडी ओढत, ढकलत पुढे चालले आहेत निर्धाराने. या संपाचे राजकारण करणारे काही राजकीय पक्षआणि पुढारी त्यांच्या नितीप्रमाणे वागलेत. अन आताही वागत आहेत. मी संपापुर्वी मिलमध्ये कामाला होतो. मलाही या संपाची झळ बसलीय. त्यावेळचे मिलमधले वातावरण कसे होते, कामगार श्रम करताना काय अनुभवित होते, दुःख-सुख कसे झेलीत होते, याविषयी येथे लिहिण्याची माझी इच्छा आहे. 💐एका गिरणबांबूची गोष्ट....... कापडाच्या मिलमधली नोकरी करण्याविषयी तितकीशी आस्था कोणी बाळगत नाही. मिलचा कामगार म्हणजे फडतूस मा...