🌹🌹आठवणीतील व्याख्याने🌹🌹

प्रवचनं, कीर्तनं आणि व्याख्यानं ही मराठमोळ्या महाराष्ट्रातील श्रद्धावान, जिज्ञासू, आणि ज्ञानप्रेमी व्यक्तींना पुर्वांपार ऊर्जा देणारी संजीवनी आहे. साऱ्या समाजाचे प्रबोधन करणारी ही विद्वान पंडितांची संजीवन चळवळ आज मात्र आपल्या मुंबईत पूर्वीइतकी उत्साही राहिलेली नाही. मुंबईकर दिवस-रात्र सोशल मीडियाच्या आभासी विश्वात रममाण होऊन मोबाईल, लॅपटॉप अन् संगणक यांच्या अधीन झालेले आहेत. रसाळ भाषेत होणारे कीर्तन- प्रवचन, व्याख्यान आता प्रत्यक्ष ऐकण्यात त्यांच्या बधीर झालेल्या मनाला फारसे स्वारस्य उरलेले नाही. असे नीरस वातावरण असूनही मुंबईतील मोजक्या समाजसेवी व शैक्षणिक संघटना आख्यान-व्याख्यान कार्यक्रमांच्या माध्यमातून नेटाने समाज प्रबोधन करीत आहेत. चिंचपोकळीचे विद्यार्थी...