🌹🌹स्वर्गस्थ🌹🌹

१९९९ मध्ये कारगिल पर्वतराजीतील ७३ दिवस चाललेले युद्ध आठवतेय तुम्हाला ? गोठवणाऱ्या थंडीमध्ये अहोरात्र देश सीमांचे रक्षण करणारे आपले शूर जवान उत्तुंग हिमालयीन शिखर रांगांतील भारतीय हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी शत्रू सैनिकांना जीवाची तमा न बाळगता रोखत होते. कडवा प्रतिकार करीत भारतीय सैन्यातील अधिकारी आणि जवानांनी देशसीमांवरील टायगर हिल व टोलोलिंग शिखर सुरक्षित करून माथ्यावर भारतीय राष्ट्रध्वज फडकावित विजय मिळवला होता. हे युद्ध यशस्वी होऊनही अद्याप आपल्या देशसीमा शत्रूच्या छुप्या कारवायांमुळे पूर्णपणे सुरक्षित नाहीत. अशा परिस्थितीत आपले शूरवीर देशसीमांचे अहोरात्र रक्षण करीत आहेत आणि म्हणूनच आपण सारे देशवाशी सुरक्षित आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या शुभदिनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला अभिवादन करताना मला...