💐💐चित्रपट गप्पा💐💐

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत दबदबा असलेला दिग्दर्शक मणिरत्नम याचे दोन चित्रपट गाजले होते. रोजा आणि बॉम्बे. दोन्ही चित्रपट संवेदनशील प्रेक्षकांनी उचलून धरले. आज येथे मी ‘रोजा’ बद्दल लिहीत आहे……….. 💐रोजा(१९९२)💐 *दिग्दर्शन-मणिरत्नम, संगीत – ए. आर. रहमान, प्रमुख भुमिका – मधू, अरविंद स्वामी, पंकज कपूर. ज्वलंत विषयाचा स्पर्श असलेला ‘रोजा’ चित्रपट मुंबईतील थिएटरमध्ये मला पहायला मिळाला. एका तरुण अधिकाऱ्याची अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका करण्याचे लष्कराकडून प्रयत्न होत असताना त्याच्या पत्नीची होणारी घालमेल आणि धावपळ यांचे चित्रण करणारा हा सुंदर चित्रपट आहे. एका कौटुंबिक घटनेतून हा चित्रपट सुरु होतो. ऋषिकुमार नावाच्या सुसंस्कृत तरुणाचे लग्न ठरलेय. तो लष्करामध्ये संगणक तज्ञ म्हणुन नियुक्त आहे. आपल्या गावाबद्दल त्याला ओढ आहे. गावचा समृद्ध निसर्ग, तेथली साधी माणसं त्याला आपलीश...