Posts

Showing posts from October, 2023

💐💐स्वर्गस्थ💐💐

Image
                  आपल्या महाराष्ट्रात आज हजारोंच्या संख्येने गिर्यारोहण संस्था अस्तित्वात आहेत . या संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून गेली चार दशके अथकपणे सुरू आहे . या कार्यात प्रारंभीपासून सक्रिय राहून साथ देणारे अनेक जाणते गिर्यारोहक व संस्था - संघटना आजही त्याच उत्साहात कार्यरत आहेत .                   मात्र महासंघाची स्थापना करण्यात स्वर्गीय साबीर शेख यांचे   मोठे योगदान होते .                    सच्चे शिवप्रेमी गिर्यारोहक , आणि मंत्रीपद भूषविलेल्या साबीर भाईंबरोबर भटकंती करण्याची संधी मला वेळोवेळी मिळाली . साबीर भाईंचे पुण्यस्मरण करताना आज काही आठवणी जाग्या झाल्या आहेत ………..        ...