Posts

Showing posts from July, 2023

💐💐चित्रपट गप्पा💐💐

Image
                     चित्रपट सृष्टीतील काही   मान्यवरांनी   चित्रपट व प्रेक्षक   यांना एकत्र आणून त्यातून ‘ जाणकार प्रेक्षक ’ घडविण्याचा ध्यास घेणारी ‘ प्रभात चित्र मंडळ ’ ही संस्था पंचावन्न वर्षांपूर्वी स्थापित केली . आज महाराष्ट्रात ही एक   प्रतिथयश संस्था म्हणून गणली जाते .                  चित्रपट रसिकांची चळवळ निर्धाराने पुढे नेणाऱ्या ‘ प्रभात ‘ चा चार जुलै हा वर्धापन दिन आहे . या   निमित्ताने संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते की ,   या संस्थेमुळेच   मला जगभरातले चांगले चित्रपट बघायला मिळाले .   प्रभात आयोजित फिल्म फे्टिव्हलमध्ये गाजलेले चित्रपट सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मी अनेकदा पाहिलेत . प्रादेशिक - विदेशी चित्रपट , मूकपट , लघुपट , माहितीपट पाहणे व त्यांवर मान्यवरांच...