💐💐मन भावन कविता, गीत अन् गाणं💐💐

आपल्या घराचे घरपण कायमस्वरुपी टिकावे , असे साऱ्यांनाच वाटते . हे सांगणारी एक भावकविता माझ्या कायम स्मरणात आहे . मोजक्या शब्दांत आपल्या घराबद्दलच्या भावना करणारे हे सुंदर काव्य आहे . मात्र हे काव्यलेखन करणारे मान्यवर कवी कोण , याचा शोध मला अद्यापही लागलेला नाही ……….. 💐 घर 💐 घर असावे घरासारखे , नकोत नुसत्या भिंती तिथे असा वा प्रेम जिव्हाळा , नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा , नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे , नकोच नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा , नकोत नुसती नाणी अश्रूतुनही प्रीत झरावी , नकोच नुसते पाणी या घरट्यातून पिलू उडावे , दिव्य घेऊनी शक्ती आकाक्षांचे पंख असावे , श्रीस्वामींवर भक्ती . :::::::::...