💐💐कथाघर💐💐

ही कथा काही क्षण तुम्हाला निसर्गरम्य कोकणात घेऊन जाणार आहे . एका सुंदर अशा आगळ्या वास्तूत आपण प्रवेश करणार आहोत . मात्र भूतकाळात नेणारी ही रम्य सफर संपताना तुम्ही अस्वस्थ व्हाल , कारण ‘ कोकण त्रिवेणी ’ आता निर्जीव अवस्थेत आहे ,...……….. 💐 कोकण त्रिवेणी 💐 जुन्या चिरेबंदी घराच्या अंगणात दादा गावडे निवांतपणे आराम खुर्चीत बसलेत . कृष्ण पक्षातली काळीभोर रात्र दादांची सोबत करतेय . सभोवतालची हिरवी वृक्षराजी शांत व एकाकी आहे . या एकाकी वातावरणात दादा आकाशी पसरलेले चांदणतारे कुतूहलाने न्याहाळत आहेत . ते न्याहाळता न्याहाळत...